आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द न्यूयाॅर्क टाइम्स-सिएना काॅलेजची पाहणी:बायडेन यांना १४ % जास्त मते, ट्रम्प यांना मतदारांनी पाहणीत नाकारले

न्यूयाॅर्क2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२० च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून द न्यूयाॅर्क टाईम्स-सिएना काॅलेजच्या पाहणीत डेमाेक्रॅटिकचे जाे. बायडेन यांनी रिपब्लिकनचे डाेनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले आहे. बायडेन यांना १४ टक्के जास्त मते मिळाली. ही पाहणी १७ जून ते २२ जून दरम्यान करण्यात आली. त्यानुसार महिला व कृष्णवर्णीय मतदारांत बायडेन यांची पकड मजबूत हाेत आहे. ट्रम्प यांच्या वर्णभेदावरून तसेच काेराेना बाबत लाेकांची राष्ट्राध्यक्षांवरील नाराजी वाढली आहे. दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या पदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पार्टीचे संभाव्य उमेदवार जाे. बायडेन यांच्यासाठी सुमारे ८४ काेटी रुपयांचा निधी उभारला.

बातम्या आणखी आहेत...