आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला महाशक्ती:बायडेन यांनी लष्कर कमांडर प्रमुख म्हणून 2 महिलांची नावे सिनेटकडे पाठवली

वाॅशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका आणखी एका इतिहासाची नाेंद करणार आहे. काही महिने अगाेदर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर जाणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या हाेता. आता राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी लष्कर कमांडरप्रमुख म्हणून दाेन महिलांची नावे सिनेटकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. जनरल जॅकलिन आेवाेस्ट आणि जनरल लाॅरा रिचर्डसन अशी या महिला कमांडरची नावे आहेत. सिनेटच्या मंजुरीनंतर एकाचवेळी दोन महिला अमेरिकन सैन्यात मोठे पद भूषवतील. आतापर्यंत लाॅरी रॉबिन्सनने हा कीर्तिमान स्थापन केला हाेता.

२०१८ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्या अमेरिकन लष्कराच्या आर्मीच्या नॉर्दन कमांडच्या प्रमुख हाेत्या. अमेरिकन सैन्यात सर्वात मोठा रँक फाेर स्टार जनरल समजली जाते. हवाईदलाच्या जनरल जॅकलिन आेवाेस्ट यांनी ते प्राप्त केले आहे. २०२० मध्ये जॅकलिन संरक्षण विभागात एकमेव महिला फाेर स्टार जनरल बनल्या आणि अमेरिकन हवाई दलाच्या इतिहासातील पाचव्या महिला ठरल्या. त्यांचे नाव वाहतूक कमांडप्रमुख म्हणून देण्यात आहे, तर थ्री स्टार जनरल लाॅरा रिचर्डसनचे नाव साऊथ कमांडप्रमुख म्हणून बायडेन यांनी प्रस्तावित केले आहे.

ट्रम्प यांच्या भीतीमुळे नाव जाहीर करण्यास विलंब
अमेरिकी ‘पेंटागाॅन’ या अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाने गेल्या वर्षी लाॅरा व जॅकलिन यांची नावा आधीच सुचवली हाेती, पण त्यांची नावे पाठवण्यास विलंब झाला. यूएस डिफेन्स हेडक्वार्टर ‘पेंटागॉन’ने गेल्या वर्षी लॉरा आणि जॅकलिनची नावे आधीच घेतली होती. परंतु त्याचे नाव पाठवण्यास उशीर झाला. त्याचे कारण माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भीती सांगितली जात आहे. लॉरा आणि जॅकलिन यांच्या नावावर ट्रम्प शिक्कामाेर्तब करणार नाहीत अशी अपेक्षा अमेरिकेचे माजी संरक्षण सचिव मार्क एस्पर यांना होती. कारण, दोन्हीही महिला आहेत. तथापि, शेवटी बायडेन यांनी ५ मार्चला दाेन्ही नावे सिनेटकडे पाठवली.

बातम्या आणखी आहेत...