आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निवडणुक प्रचार:बायडेन समर्थकांच्या घाेषणा‘अपना नेता कैसा हो, जो. बायडेन जैसा हो’... हिंदीसह 14 भाषांत प्रचार माेहीम

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाबी, तेलुगू, बंगाली, उर्दू, आणि इतर प्रादेशिक भाषांत अनेक प्रकारच्या घाेषणा

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी प्रचाराला वेग येऊ लागला आहे. या शर्यतीमधील डेमाेक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जाे. बायडेन यांच्या समर्थकांनी हिंदीसह १४ भाषांतून प्रचार माेहीम सुरू केली. भारतवंशीय अमेरिकींशी संवाद साधण्यासाठी बायडेन यांच्या टीमने ‘अमेरिका का नेता कैसा हाे, जाे बायडेन जैसा हाे’ अशी भारतातील प्रचारकी थाटातील घाेषणाही आता तेथे कानावर पडू लागली आहे.

हिंदीबराेबरच पंजाबी, तेलुगू, बंगाली, उर्दू, कन्नड, मल्याळम आणि इतर प्रादेशिक भाषांत अनेक प्रकारच्या घाेषणा तयार करण्यात आल्या आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ३ नाेव्हेंबरला हाेणार आहे. २०१६ मध्ये ट्रम्प यांची प्रचारातील ‘अबकी बार, ट्रम्प सरकार’ या घाेषणेला चांगले यश मिळाले हाेते. ही घाेषणा नरेंद्र माेदी यांच्या २०१४ च्या निवडणुकीतील ‘अबकी बार माेदी सरकार’च्या धर्तीवर तयार केली हाेती. हे लक्षात घेऊन बायडेन यांच्यासाठी देखील भारतीय पद्धतीची घाेषणा तयार करण्यात आली. बायडेन यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अर्थ समितीचे सदस्य अजय भुटाेरिया म्हणाले, आमची प्रचार यंत्रणा भारतवंशीय अमेरिकी मतदारांशी त्यांच्या भाषेतून संवाद साधण्याची याेजना तयार करत आहे. सध्या १४ हून जास्त भाषांमध्ये संवाद साधण्यासाठी बायडेन एशियन अमेरिकन अँड पॅसिफिक आयलँडर (एएपीआय) टीमसाेबत समन्वय करत आहेत.

ट्रम्प यांचे घूमजाव : निवडणूक टाळायची नाही- नाेव्हेंबरमध्ये हाेऊ घातलेल्या निवडणुकीला पुढे ढकलण्याच्या वक्तव्यावरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घूमजाव केला. कारण त्यांना स्वकीयांकडूनच पाठिंबा मिळाला नाही. रिपब्लिकन पार्टीच्या अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्याकडे निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर ट्रम्प म्हणाले, निवडणूक टाळत नाही. परंतु, बनावट मतदान राेखण्याची माझी इच्छा आहे. अमेरिकेच्या संविधानानुसार राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची तारीख बदलण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांकडे नाही. संविधानानुसार राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक २० जानेवारीपर्यंत काेणत्याही स्थितीत घ्यावी लागेल.