आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिपब्लिकनचा बालेकिल्ला:अॅरिझोनामध्ये बायडेन विजयी, 11 हजार मतांच्या काठावर विजय, आता इलेक्टाेरल मतांची संख्या 290

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रम्प यांची भिंत पाडणार : डोनाल्ड ट्रम्प यांनी घुसखाेरी रोखण्याच्या उद्देशाने मेक्सिकोच्या सीमेवरील बांधलेली भिंत आता जो बायडेन पाडतील, असे त्यांच्या टीमने स्पष्ट केले आहे. - Divya Marathi
ट्रम्प यांची भिंत पाडणार : डोनाल्ड ट्रम्प यांनी घुसखाेरी रोखण्याच्या उद्देशाने मेक्सिकोच्या सीमेवरील बांधलेली भिंत आता जो बायडेन पाडतील, असे त्यांच्या टीमने स्पष्ट केले आहे.
  • 1948 मध्ये ट्रुमन, 1996 ला बिल क्लिंटन झाले विजयी

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांनी अॅरिझाेनामध्ये विजय संपादन केला आहे. या विजयासह त्यांच्या खात्यात ११ इलेक्टाेरल मतांची भर पडली आहे. गेल्या ७२ वर्षांत डेमाेक्रॅट उमेदवाराला या प्रांतात विजय मिळण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. या आधी १९४८ मध्ये हॅरी ट्रुमन, १९९६ मध्ये बिल क्लिंटन यांनी डेमाेक्रॅट उमेदवार म्हणून विजय संपादन केला हाेता.

या विजयाबराेबरच बायडेन यांच्या इलेक्टाेरल मतांची संख्या २९० वर गेली आहे. व्हाइट हाऊसची शर्यत जिंकण्यासाठी त्यांना २७० मतांची गरज हाेती. ट्रम्प यांना आतापर्यंत २१७ मते मिळाली आहेत. जाॅर्जिया व नाॅर्थ कॅराेलिनामध्ये अजूनही मत माेजणी सुरूच आहे. १६ इलेक्टाेरल मत असलेल्या जाॅर्जियामध्ये बायडेन आणि १५ इलेक्टाेरल मत असलेल्या नाॅर्थ कॅराेलिनामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. बायडेन यांना अॅरिझाेनामध्ये ट्रम्प यांच्या तुलनेत केवळ ११ हजार (०.३ टक्के) मते जास्त पडली आहेत. चार वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी ३.५ टक्के मतांच्या अंतराने हा प्रांत जिंकला हाेता.

ट्रम्प गटाने दाखल केला खटला
ट्रम्प गटाने अॅरिझाेनामध्ये देखील एक खटला दाखल केला. राज्यातील सर्वात माेठी काैंटी मॅरिकाेपामध्ये मतदान अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने लाेकांवर मत देण्यासाठी दबाव टाकल्याचा या गटाने आराेप केला. अॅरिझाेनाच्या अॅटर्नी जनरल मार्क ब्रनाेविच म्हणाले, राज्यातील अधिकाऱ्यांना निवडणुकीबद्दल एक हजार तक्रारी मिळाल्या हाेत्या. परंतु, मतदारांची फसवणूक झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. मार्क ब्रनाेविच रिपब्लिकन पार्टीचे आहेत.

ट्रम्प यांच्या पार्टीचे नेते म्हणाले, बायडेन यांना गाेपनीय माहिती द्यावी
डाेनाल्ड ट्रम्प यांनी जाे बायडेन व त्यांच्या टीमसाेबत काेणत्याही स्वरूपाची माहिती देण्यास नकार दिला आहे. बायडेन यांना देशाशी संबंधित गाेपनीय माहिती दिली जावी, अशी त्यांच्या पक्षातील अनेक सदस्यांची मागणी हाेती. तसे न झाल्यास अमेरिकेच्या सुरक्षेला धाेका निर्माण हाेऊ शकताे. सिनेटर राॅय ब्लंट म्हणाले, बायडेन यांनी याप्रसंगी सर्व काही जाणून घ्यावे, हे आवश्यक वाटत नाही. परंतु त्यांनी काही गाेष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. राष्ट्रीय सुरक्षा ही त्यादृष्टीने महत्त्वाची गाेष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...