आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका निवडणूक:बायडेन यांचा अजेंडा ‘मेड इन चायना’ आणि माझा ‘मेड इन अमेरिका’ आहे : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका निवडणूक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिपब्लिकन पार्टीच्या संमेलनात समारोपाच्या दिवशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पत्नी मेलानिया व कुटुंबातील सदस्यांसह पोहोचताच आतषबाजी करण्यात आली.
  • उमेदवारी स्वीकारल्यानंतर व्हाइट हाऊसच्या लॉनमध्ये भाषण करणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले ट्रम्प

अलेक्झांडर बर्न्स / मॅगी हॅबरमॅन
समाजवाद, अराजक व कट्टरवादासारख्या शक्तींशी एकटा लढा देत आहे, असा संदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमातून दिला. बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाल्यास अमेरिकेचे स्वप्न भंग पावेल, असा इशाराही त्यांनी दिला. रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांनी शुक्रवारी दुसऱ्या टर्मसाठी उमेदवारी स्वीकारली. त्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी बायडेन यांचा अजेंडा ‘मेड इन चायना’ आहे आणि माझा ‘मेड इन अमेरिका’ आहे, असे सांगितले. आता अमेरिकन नागरिक स्वप्न अबाधित ठेवतात की हाती आलेल्या गोष्टी एका समाजवादी अजेंड्याला नष्ट करण्याची परवानगी देतात, हे या निवडणुकीद्वारे समजणार आहे. कायद्याचे पालन करणाऱ्या अमेरिकींचे संरक्षण होणे महत्त्वाचे वाटते की धमकी देणारे व हिंसक-अराजक आंदोलकांना सूट देणे महत्त्वाचे, हे ठरवण्याची वेळ आली आहे.

- यंदा सुरक्षित, प्रभावी लस आणू. ३ लसी अंतिम टप्प्यात आहेत. अॅडव्हान्समध्ये त्याचे उत्पादन सुरू आहे. - अमेरिकी महत्त्वाकांक्षेच्या नव्या युगाचा आरंभ करू. अमेरिका चंद्रावर पहिल्या महिलेला उतरवेल : ट्रम्प

कोरोना, वंशभेदासारख्या मुद्द्यांवर बायडेन यांच्यावर हल्ला, स्वत:ची पाठ स्वत: थोपटली
परंपरा भंग : राजकीय लाभासाठी व्हाइट हाऊसचा केला वापर

ट्रम्प यांचे भाषण व्हाइट हाऊसच्या हिरवळीवर झाले. राजकीय घडामोडींसाठी व्हाइट हाऊसचा वापर न करण्याचे संकेत त्यामुळे धुळीस मिळाले. परंपरा-नियमांची ऐशीतैशी करण्यात आली. पाहुण्यांमध्ये डिस्टन्सिंग दिसले नाही. कुणालाही मास्क महत्त्वाचा वाटला नाही. अमेरिकेतील वंशभेद आणि हिंसाचार वाढलाय. निवडणुकीतील मोठा मुद्दाही आहे. याप्रश्नी लवकरच चांगले घडून येईल, असे ट्रम्प यांनी आफ्रिकन-अमेरिकन समुदायाकडे स्पष्ट केले.

विरोधकांचा हल्ला : बायडेन यांचे ट्वीट : स्वत:ला विचारा, किती सुरक्षित?
ट्रम्प यांनी भाषणात बायडेन यांच्या अमेरिकेत कुणीही सुरक्षित राहणार नाही, असे म्हटले होते. त्याचा बायडेन यांनी ट्वीटद्वारे समाचार घेतला. ट्रम्प म्हणतात बायडेन यांच्या अमेरिकेत कुणी सुरक्षित नसेल. मग आजूबाजूला बघा. स्वत:ला विचारा. ट्रम्प यांच्या अमेरिकेत किती लोक सुरक्षित आहेत? उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनीही ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ट्रम्प अमेरिकींना कोरोनापासून वाचवू शकलेेले नाहीत. चीन सरकारबाबत अमेरिकेने कडक धोरण अवलंबण्याची वेळ होती, तेव्हा ते लपून बसले होते.

खाेटेपणा: २५ मुद्दे मांडले, ५ खरे, ४ खोटे, ९ दिशाभूल करणारे, ७ बढाई
७० मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी २५ मुद्दे मांडले. न्यूयॉर्क टाइम्सच्या विश्लेषणानुसार त्यापैकी केवळ ५ वास्तववादी होते. ४ पूर्णपणे खोटे, ७ बढाई मारणारे तर ९ मुद्द्यांद्वारे त्यांनी दिशाभूल केली. भाषणातून ट्रम्प यांनी कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु वास्तव पूर्णपणे भिन्न आहे. बायडेन यांच्यामुळे देशाचे स्वप्न धुळीस मिळेल. तरूणांना हक्काचा रोजगार मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.

भूतकाळाचा विसर : ३६ वर्षे पक्षाचा ध्वज बुलंद करणारे संमेलनास गैरहजर
१९८० ते २०१६ पर्यंत रिपब्लिकन पार्टीचे नेतृत्व करणारे पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, माजी राष्ट्राध्यक्ष, माजी उपराष्ट्राध्यक्ष संमेलनास उपस्थित नव्हते. बुश, चेनी व बेकर्स यापैकी कोणीही दिसले नाहीत. कोंडोलिसा राइसदेखील दिसल्या नाहीत. ट्रम्प यांनी माजी नेत्यांपासून अंतर ठेवले आहे. सिनेटमधील नेते मिच मॅक्कानेल, अल्पसंख्याक नेते कॅविन मॅक्केर्थी यांनादेखील व्यासपीठावर जागा देण्यात आली नाही. संमेलनादरम्यान १० तासांच्या वेगवेगळ्या भाषणांत ट्रम्प यांनी बुश व रिगन यांचे नाव घेतले.