आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायडेन यांच्या निवासस्थानी छापेमारी:गोपनीय दस्तऐवज प्रकरणात बायडेन यांच्या घरावर एफबीआयचा छापा

डेलावेअर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. रेहोबोथ येथे समुद्रकिनारी बायडेन यांच्या वडिलोपार्जित घराव्यतिरिक्त २ ठिकाणांचा तपास करण्यात आला. .

गेल्या महिन्यात बायडेन यांच्या निवासस्थानी संवेदनशील गोपनीय दस्तऐवज आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाईत नवीन कागदपत्रे मिळाली किंवा नाही, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. रेहोबोथ येथील निवासस्थानी नियमानुसार झडती घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या महिन्यातही बायडेन यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. तेव्हा १३ तासांच्या शोधानंतर सहा गोपनीय दस्तऐवज जप्त करण्यात आले होते. बराक ओबामा यांच्या कार्याकाळत बायडेन उपराष्ट्राध्यक्ष असतानाची ही कागदपत्रे आहेत. सरकारी कार्यालय सोडल्यानंतर अशा कागदपत्रांना अभिलेखागाराकडे जमा करावे लागते, असा अमेरिकेतील नियम आहे.

बातम्या आणखी आहेत...