आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांना सत्तेची सूत्रे हाती घेऊन २० जानेवारी राेजी वर्षपूर्ती हाेईल. काेराेनाकाळ पाहता बायडेन यांच्यासाठी दुसरे वर्ष अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. बायडेन यांच्या पाेल रेटिंगमध्ये २५ टक्के घट झाली आहे. बायडेन यांना आपल्याच डेमाेक्रॅटिक पार्टीतून नेतृत्वासाठी आव्हान दिले जात आहे. आता पक्षातून अनेक नवे चेहरे नेतृत्वासाठी चर्चेत आले आहेत. साेबतच नाेव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुकीत कनिष्ठ सभागृहात पक्ष बहुमत गमावण्याची शक्यता वर्तवली जाते. २०२४ ची अध्यक्षपदाच्या निवडणुकीला केवळ दाेन वर्षे बाकी असतानाच हा निकाल येण्याची शक्यता आहे. त्यातून अनेक उलथापालथी घडू शकतात. ताेपर्यंत बायडेन ८२ वर्षांचे हाेतात. त्यामुळे वयदेखील अध्यक्षपदासाठी अडथळा ठरू शकते. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासाेबतही त्यांचे पटत नाही.
किमान वेतनाला लेफ्ट विंगचा विराेध
ताशी किमान १३५० रुपये वेतन देण्याच्या मागणीवरून देशात असंताेषाची भावना दिसते. बायडेन यांना डेमाेक्रॅटिक म्हणजेच स्वकीयांकडूनच विराेध व टीकेला सामाेरे जावे लागत आहे. बायडेन यांनी बाबत काहीही िनर्णय घेतला नाही. त्यामुळे लेेफ्ट विंगच्या नीना टर्नर यांनी कडाडून टीका केली. टर्नर कट्टर बायडेन विराेधक मानल्या जातात. बर्नी सँडर्सच्या उमेदवारीचा प्रस्ताव त्यांनी मांडला हाेता. ३५ वर्षीय अलेक्झांड्रिया यांना बायडेन यांचा पर्याय म्हणून पाहिले जाते. कमला हॅरिसदेखील दावेदार ठरू शकतात. जॅफ वीवरदेखील पक्षातील बायडेन विराेधक म्हणून परिचित आहेत. डेमाेक्रॅटिक पक्षातील लेफ्ट विंगकडून उमेदवारीसाठी आव्हान मिळू शकते.
बायडेन यांच्यासाठी यंदा पाच माेठी आव्हाने, बेराेजगारी माेठा मुद्दा
1 अमेरिकेत बेराेजगारीचे दर ४.२ टक्के राहिला. राेजगाराच्या संधी मात्र खूप कमी झाल्या.
2 60% लाेकांचेच पूर्ण लसीकरण. वास्तविक ८० टक्के लाेक अपेक्षित हाेते.
3 1.75 टट्रिलियन डाॅलरचे बिल्ड, बॅक, बॅटर बिल काँग्रेसमध्ये पारित झाले नाही.
4 आॅगस्ट २०२१ नंतर सातत्याने महागाईचा दर वाढताच राहिला आहे.
5 प्रशासनातील १७१ पदांवर अद्यापही नियुक्ती हाेऊ शकलेली नाही.
बायडेन यांना २९ %, ट्रम्प यांच्या उमेदवारीला ३९ % जणांचा कौल
अध्यक्षपदाचा एकच कार्यकाळ पूर्ण करू शकणारे रिपब्लिकनचे डाेनाल्ड ट्रम्प पुढील निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या शर्यतीतून बाहेर गेलेले नाहीत. डिसेंबरमध्ये झालेल्या एका पाहणीनुसार २०२४ साठी २९ टक्के लाेकांनी बायडेन यांना पाठिंबा दर्शवला तर ट्रम्प यांच्या उमेदवारीसाठी ३९ टक्के लाेकांनी पाठिंबा दिला आहे. कॅपिटल िहंसाचाराच्या घटनेनंतरही ट्रम्प यांची प्रतिमा राष्ट्रवादाचा करारी चेहरा अशी बनलेली आहे. पाहणीत सहभागी ३५ टक्के लाेकांनी बायडेन यांनी पुन्हा निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त केले. तर ४५ टक्के लाेकांनी ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्मसाठी पाठिंबा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.