आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत विश्वासार्हता संकटात:बायडेन यांची रेटिंग 42%; 10 पैकी 7 लोक म्हणाले, देश चुकीच्या दिशेने

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महागाई, सीमा, अफगाणिस्तानच्या पराभवामुळे बायडेन यांची विश्वासार्हता घसरली

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची प्रतिष्ठा खालावत आहे. या एप्रिलमध्ये एनबीसी न्यूजच्या पहिल्या सर्वेक्षणानंतर त्यांची रेटिंग १० अंक घसरली आहे. मतदानाच्या नऊ महिन्यांनंतर रेटिंग घसरून ४२% झाली. याआधी सुरुवातीच्या टप्प्यात बायडेन यांच्याशिवाय माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता घटली होती. ७८ वर्षीय बायडेन यांची अस्वीकारार्हता एप्रिलपासून १५ अंक वाढून ५४% पोहोचली आहे. ७१% लोकांना देश चुकीच्या दिशेने जात असल्याचे पाहणीत दिसले. एक चतुर्थांशपेक्षाही कमी लोकांनी देश योग्य व्यक्तीच्या हातात असल्याचे म्हटले आहे. पाहणीत ७५% लोकांनी अर्थव्यवस्था प्रकरणात बायडेन यांना अयशस्वी ठरवले. मात्र, जी-२० बैठकीनंतर पत्रपरिषदेत बायडेन यांनी घसरत्या रेटिंगची चिंता फेटाळली. ७८ वर्षीय बायडेन म्हणाले, पुढच्या निवडणुकीचा विचार न करता मी राष्ट्राध्यक्ष म्हणून आपले काम करत आहे.

बायडेन-हॅरिसमध्ये दरी, फेब्रुवारीत ३८ वेळा एकत्र, ऑक्टोबरमध्ये ८ वेळा
बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यात अंतर पडल्याचे वृत्त आहे. ते दोघे एकोपा दाखवण्यासाठी खूप कमी कार्यक्रमांत एकत्र दिसत आहेत. फेब्रुवारीमध्ये दोघांची जोडी ३८ वेळा दिसली. ऑक्टोबरमध्ये दोघे केवळ ८ वेळा दिसले. हॅरिस यांनी स्वत:ला राष्ट्राध्यक्षांपासून दूर केल्याचे वृत्त आहे. हॅरिस यांच्याकडे स्थलांतरितांचा मुद्दा सोपवल्याने हे घडल्याचे वृत्त आहे.

अफगाण पराजय, आर्थिक अपयश आल्याने बायडेन यांची प्रतिष्ठा घटली
बायडेन यांनी जानेवारीत पदभार स्वीकारल्यानंतर अनेक देशांतर्गत संकटांचा सामना केला. त्यात अफगाणिस्तानहून अमेरिकेची त्वरेने वापसी, द. सीमेवर प्रवाशांची वाढती संख्या आणि वाढत्या महागाईसोबत संयुक्त पुरवठा साखळीच्या मुद्द्याचा समावेश आहे. यामुळे देशात पुरवठा संकट उभे राहिले. सप्टेंबरमध्ये महागाई दर १३ वर्षांनंतर ५.४% वर गेला.

आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीने थोडी आगेकूच केली, मात्र स्पष्ट जनादेश कुणालाही नाही
या पाहणीने आगामी २०२२ च्या मध्यावधी निवडणुकीत बायडेन प्रशासनाला आरसा दाखवला आहे. सर्व्हेत कोणत्याही पक्षाला उत्साही समर्थन मिळत नाही. ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष थोडे चांगले करत आहे. ३५% लोकांनुसार, ते रिपब्लिकन पक्षाचे सरकार होताना पाहत आहेत. दुसरीकडे, ३३% डेमॉक्रॅट्सना अनुकूल रूपात पाहतात. रिपब्लिकनसाठी सकारात्मक-नकारात्मक दृष्टिकोनाचा फरक कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...