आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Biden's Reputation Plummeted, Now Fearful Of Losing Midway; Army Officers On Army Return Policy; News And Live Updates

ग्राउंड रिपोर्ट:बायडेन यांची प्रतिष्ठा घटली, आता मध्यावधी हरण्याची भीती; लष्कर परतीच्या धोरणावर सैन्य अधिकारी

न्यूयॉर्क13 दिवसांपूर्वीलेखक: मोहम्मद अली
  • कॉपी लिंक
  • विरोधी पक्ष तसेच स्वत:च्या पक्षाच्या निशाण्यावर राष्ट्राध्यक्ष बायडेन
  • सैन्य अधिकारी म्हणाले, बायडेन यांनी सर्व काही बिघडवले

अमेरिकेत तीन आठवड्यांपूर्वी अफगाणिस्तानातून लष्कर बोलावण्याचे समर्थन फक्त डेमोक्रॅटिकच करत नव्हते, तर विरोधी पक्ष रिपब्लिकनचे बहुतांशी सदस्यही करत होते. आज स्थिती बदलली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना सैन्यातील दिग्गज, विरोधी पक्ष व स्वत:च्या पक्षातही टीका ऐकावी लागत आहे. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची रेटिंग ५०% च्या खाली आली आहे. काही सर्व्हेत तर रेटिंग ४३% पर्यंत गेली आहे. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या महत्त्वाच्या मध्यावधी निवडणुकीत पक्षाची स्थिती कमकुवत होऊ शकते. अफगाणिस्तानातून परतण्याबाबत बायडेन यांची हाताळणी चांगली होऊ शकली असती असे प्रत्येकाला वाटते. अनेक डेमोक्रॅट म्हणताहेत की, सैनिक परतण्याआधी कोणीही अमेरिकी अडकणार नाही असे आश्वासन बायडेन यांनी दिले होते. मात्र असे होऊ शकले नाही. अजूनही अमेरिकी नागरिक अडकले आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षात दोन गट झाले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा समर्थक अनेक डेमोक्रॅटिक नेते लष्कर तैनातीच्या बाजूने आहेत, तर बर्नी सँडर्सच्या नेतृत्वात डावे डेमोक्रॅटिक नेते त्याविरोधात आहेत. मात्र दोघेही बायडेन यांना घेरताहेत. बर्नी सँडर्स गटाचे नेते आर. ओ. खन्ना यांनी लष्कर परतण्यास फुशारकी मारण्यासारखे पाऊल म्हटले आहे. सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष बॉब मेनेंडेज म्हणाले, यामुळे मी निराश आहे. अनेक वर्षांचे धोरण व गुप्तचरातील अपयशाचे भयावह परिणाम आम्हाला समोर दिसत आहेत. सिनेटमध्ये सशस्त्र सेवांचे अध्यक्ष जॅक रीड यांनी सांगितले, अखेर चूक कोठे झाली यावर सुनावणी करणार. सिनेटचे परराष्ट्र धोरण समितीचे सदस्य बेन कार्डिन म्हणाले, अमेरिकेसाठी कोणत्याही प्रकारे चांगला दिवस म्हणता येणार नाही. आमचे नुकसान झाले यात शंका नाही. लष्कर बोलावण्यावरून सर्वात मोठा निशाणा सैन्यातील माजी अधिकाऱ्यांनी साधला आहे.

२००९ मध्ये अफगाणिस्तानात एका खाणीत डॅन बर्शिंस्की यांचे पाय तुटले होते. त्यांनी दैनिक भास्करला सांगितले, आमच्या सरकारकडे कोणतीही योजना नव्हती यामुळे मी निराश आहे. अफगाणिस्तानात २०१२ मध्ये अमेरिकी मरीन असलेले मायकल बॉयड म्हणतात, जमिनीवर सामरिक स्थितीसाठी नेहमीच कमांडर इन चीफ जबाबदार असतो. या अपयशाची जबाबदारी बायडेन यांनी घ्यायला हवी. २० वर्षांनंतर आपण पाठ दाखवायला नको होती. अफगाणिस्तान व इराकमध्ये माजी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे संस्थापक पॉल रीकऑफ यांनी सांगितले, बायडेन यांचा मुलगा शहीद झाला होता म्हणून ते रिपब्लिक किंवा डेमोक्रॅट्सपेक्षा वेगळे असतील असे आम्हाला वाटायचे. अनेक माजी अधिकाऱ्यांना वाटते की, लष्करासोबत बायडेन यांनी चांगले संबंध ठेवले, मात्र अफगाणिस्तानातून लष्कर हटवण्याच्या धोरणांनी संबंध बिघडवले आहेत.

४२% अमेरिकींनी स्वीकारले, बायडेन पूर्णपणे अपयशी
सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वेत बायडेन यांची अप्रूव्हल रेटिंग ५०%च्या खाली आली. ४२% लोक सांगत आहेत की, अफगाणिस्तानात बायडेन पूर्णपणे अपयशी ठरले. त्या ७ स्विंग स्टेट्समध्येही बायडेन पिछाडीवर आले जे त्यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांच्याकडून हिसकावले होते. २०२४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर आघाडी घेतली आहे.

डेमोक्रॅट्स घाबरले, ट्रम्प यांना मुद्दा मिळाल्याचे म्हणताहेत
विनाशकारी अफगाणिस्तानातून परतल्याने आगामी मध्यावधी निवडणुकीत त्यांची पकड ढिली झाल्याने डेमोक्रॅट्स घाबरले आहेत. बहुतांश डेमोक्रॅट पत्रकारांना ऑफ द रेकॉर्ड सांगतात, हा बायडेन प्रशासनाचा सर्वात कठीण क्षण आहे. त्यांना वाटते की, रिपब्लिकन पक्षाकडे मुद्दा नव्हता, मात्र त्यांच्या हाती एक शक्तिशाली ‘दारूगोळा’ लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...