आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध पॉप स्टार जस्टिन बीबरने चेहऱ्याला पक्षाघात झाल्यामुळे या आठवड्यातील सर्व शो रद्द केले आहेत. २८ वर्षीय बीबरने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली. त्याची ही अवस्था ‘रामसे हंट सिंड्रोम’मुळे झाली. या दुर्मिळ आजाराचे कारण ‘व्हेरिसेला जोस्टर व्हायरस’ आहे.
यामुळे कांजण्या होतात. तो मेंदूच्या नसांवर हल्ला करतो तेव्हा चेहरा व कानाच्या आसपास पुरळ उठतात व पक्षाघात होतो. बीबर म्हणाला, व्हायरसने कान, चेहऱ्याच्या नसांवर हल्ला केला आहे. चेहऱ्याच्या उजव्या भागाला पक्षाघात झाला आहे. माझ्या पापण्या लवत नाहीत. मी मोठ्याने हसूही शकत नाही. उल्लेखनीय म्हणजे ‘बेबी’, ‘सॉरी’, ‘गोस्ट’ आणि ‘लोनली’ या गाण्यांसाठी प्रसिद्ध बीबरने १३ वर्षांचा असतानाच नाव कमावले आहे. त्याने २ ग्रॅमी अवॉर्डही जिंकले आहेत.
दिल्लीत १८ ऑक्टोबरला होणार होता बीबरचा शो
मे २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान बीबरचे जस्टिस वर्ल्ड टूरमध्ये ४० देशांत १२५ शो होणार आहेत. वृत्तानुसार, यासाठी १.३ कोटी तिकिटांची विक्री झाली आहे. १८ ऑक्टोबरला दिल्लीत कार्यक्रम होणार होता. बीबरने मे २०१७ मध्ये मुंबईत पहिला शो केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.