आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रॅगनचा दिलासा नाही:चीनच्या अटीमुळे पाकिस्तानसह कर्जदार 20 देशांवर मोठे संकट

इस्लामाबाद/लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या अडचणी वाढत आहेत. एकीकडे अनेक अटींवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून(आयएमएफ) मदतीच्या पॅकेजसाठी सहमत झाला आहे. दुसरीकडे, व्यावसायिकही या अटींच्या पूर्ततेसाठी सरकारच्या प्रस्तावित करवाढीला विरोध करत आहेत. त्यांनी सांगितले की, सरकारने हे लागू करू नये,अन्यथा संप करू. पाकिस्तानचे मूळ संकट कर्जाचे जाळे आहे. गेल्या २ दशकांपासून चीनच्या मदतीत वाढ झाली आहे. चीनकडून कर्ज घेणाऱ्या अशा देशांची आर्थिक स्थिती वाईट आहे. दिवाळखोर होण्याच्या मार्गावरील पाकिस्तानसह ३८ पैकी सुमारे २० देशांना चीनने सर्वाधिक कर्ज दिले आहे. जागतिक बँकेनुसार, २०१७ मध्ये गरीब देशांवर जीडीपीच्या ११% समाने चीनचे कर्ज होते. हा आकडा वाढत आहे.

कोविड १९ आणि वाढत्या व्याज दरांमुळे अडचणी वाढल्या आहेत. चीन कर्जदार होण्याआधी पाश्चिमात्त्य देशांनी बॅड लोन निस्तारण्यासाठी एक आराखडा बनवला होता. कर्जदार देश मिळून जुन्या अटींवरच पेमेंट नव्याने निश्चित करत होते. कर्जमाफीला प्राधान्य दिले होते. अशा पद्धतीने पाश्चिमात्त्य देशांकडून कर्ज घेणारे देश वाईट स्थितीतून वाचत होते. मात्र, चीन जुना नियम लागू करण्यास नकार देत आहे. जी-२० देशांनी त्यास आपल्या कक्षेत आणण्यासाठी २०२० मध्ये नवा आराखडा बनवला होता. मात्र, महामारीनंतर व्याजदर कमी करण्यासारखी व्यवस्था बंद झाली. चीन कर्ज माफीसाठीही तयार नाही. त्याच्या कर्जाची मोठी समस्या ही की, चीन एकटा काम करतो. चीन दिवाळखोरीला प्रोत्साहन देण्याच्या नियतीने एकटा चर्चा करतो. जागतिक बँकेनुसार, २००८ नंतर चीनने ७१ देशांच्या कर्जाच्या अटी बदलल्या आहेत. मात्र,त्याने आपल्या अटींवर असे केले नाही. दुसरीकडे, पाश्चिमात्त्य देशांच्या पॅरिस क्लबने ६८ देशांचे कर्ज पुनर्गठीत केले आहे.

१५ वर्षांत चीनने ७१ देशांना दिलेल्या कर्जात अटी लादल्या
पाकवर ३०% कर्ज एकट्या चीनचे, आयएमएफचे याच्या एक तृतीयांश
पाकिस्तानवर २२.५० लाख कोटी रुपयांहून जास्त कर्ज आहे. आयएमएफनुसार, या कर्जाचा ३०% हिस्सा चीनचा आहे. त्याने ३० अब्ज डॉलर चीनकडून कर्ज घेतले आहे. हे आयएमएफच्या एकूण कर्जाच्या तिप्पट आहे.पाकिस्तानचे मित्र देश त्याला संकटात पैसा देत होते. त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांना ऐनवेळी चमत्कार होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या वेळी चीनने मदत दिली नाही. पॅकेजचा सल्ला दिल्यानंतर सौदी अरेबिया गप्प आहे. एकटे आयएमएफ पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकत नाही.

चीन कर्जदारांकडून अन्य संघटनांच्या तुलनेत २% जास्त व्याज वसूल करतो
पाकिस्तानच्या सस्टनेबल डेव्हलपमेंट पॉलिसी इन्स्टिट्यूटनुसार, चीनचे कर्ज आर्थिक सहकार्य व विकास परिषदेसारख्या संघटनांच्या तुलनेत २% महाग असते. कठोर अटी लादल्याने कर्ज घेणाऱ्या देशासाठी हा गळ्याला लागलेला फास ठरतो.
{पाकच्या रुपयातील घसरण सुरू आहे. असे असतानाही वित्तमंत्री इशाक डार बेफिकीर आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची संपन्नता ईश्वराच्या हाती आहे. बऱ्याचदा दैवी मदत आयएमएफच्या रूपात येते. १९६० नंतर निधी किंवा पाश्चिमात्त्य सरकारांनी २१ वेळा पाकला सावरले.

बातम्या आणखी आहेत...