आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेपाळच्या सुप्रीम कोर्टाने फ्रान्सचा सीरियल किलर चार्ल्स शोभराजची १९ वर्षांनंतर त्याच्या वयाच्या आधारे तुरुंगातून सुटकेचे आदेश दिले. २ अमेरिकी पर्यटकांच्या हत्येच्या आरोपात चार्ल्स २००३ पासून तुरुंगात आहे. फ्रान्सच्या पर्यटकांना विष दिल्याप्रकरणी त्याला भारतातही २० वर्षांची शिक्षा झाली होती. सुटकेच्या १५ दिवसांत त्याचे फ्रान्सला प्रत्यार्पण केले जाईल. ७८ वर्षांचा शोभराज हृदयरुग्ण आहे. नेपाळमध्ये ७० वर्षांवरील वयाच्या आरोपींच्या सुटकेची तरतूद आहे.
वेगवेगळ्या देशांत चार्ल्सने केल्या अनेक हत्या
द सर्पंट व बिकिनी किलरसारख्या नावाने कुख्यात शोभराजची आई व्हिएतनामी आणि वडील भारतीय होते. वडिलांनी त्याला स्वीकारण्यास नकार दिला. व्हिएतनामवर फ्रान्सचा ताबा असल्याने त्याला फ्रान्सचे नागरिकत्व मिळाले. ओळख लपवण्यात आणि वेश बदलण्यात पारंगत शोभराज पर्यटक व तरुणींना सावज बनवत होता. त्याच्यावर १९७२ ते १९८२ दरम्यान भारत, थायलंड, नेपाळ, तुर्कस्तान व इराणमध्ये हत्येचे २० पेक्षा जास्त आरोप आहेत. शोभराज चकमा देऊन तुरुगांतून पळत राहिला किंवा लाच देऊन कारागृहात सुविधा मिळवत राहिला. शोभराजला सर्वात आधी १९७६ मध्ये भारतात पकडले. त्याला १२ वर्षांची शिक्षा झाली, पण तो १९८६ मध्ये तिहार तुरुगांतून पळाला. वस्तुत: त्याने कारागृहात वाढदिवसाची पार्टी दिली. पार्टीला बंदिवानांसह सुरक्षा रक्षकही हजर होते. पार्टीमध्ये वाढण्यात आलेल्या बिस्किट-फळांमध्ये झोपेचे औषध होते. सुरक्षा रक्षक व इतर कैदी झोपताच तो ४ कैद्यांसोबत पळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.