आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाक परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विधानावर आता अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी म्हटले आहे की, आम्हाला दोन्ही देशांत शाब्दिक युद्ध नव्हे तर संबंध सुधारण्यासाठी चर्चा हवी आहे.
नेड म्हणाले की, आमची भारतासोबत रणनीतीक भागीदारी आहे. तर पाकसोबतही विस्तृत भागीदारी आहे. आमच्यासाठी दोघांचेही वेगवेगळे महत्त्व आहे. त्यामुळे भारत-पाकने आपसातील मतभेद चर्चेद्वारे सोडवण्याची गरज आहे.
भारत-पाक आमचे मित्र
अमेरिकन प्रवक्ता म्हणाला - आम्हाला भारत-पाक या दोन्ही देशांसोबतची भागीदारी कायम राखण्याची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा भारतासोबतची भागीदारी मजबूत करण्याची गोष्ट करतो, तेव्हा आम्ही एकमेकांसोबत फ्रँक होऊ शकतो. तसेच आमचे एखाद्या मुद्यावर मतैक्य नसेल तर आम्ही त्यावर चिंताही व्यक्त करतो. पाकसोबतही आमचे असेच नाते आहे.
पीएम मोदींच्या सल्ल्याचे कौतुक
प्राइस यांनी यावेळी युक्रेन युद्ध रोखण्यासाठी पीएम नरेंद्र मोदी यांनी रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना दिलेल्या सल्ल्याचेही कौतुक केले. मोदी युद्ध रोखण्यासाठी म्हणाले होते की, हे युग युद्धाचे नाही. अमेरिका भारतासोबत संपर्कात राहिली तर दोन्ही देशांतील सहकार्यांच्या संधी वाढतील, असेही नेड प्राइस यावेळी आगामी जी-20 परिषदेवर भाष्य करताना म्हणाले.
पाकच्या परराष्ट्र मंत्री मोदींना म्हणाले होते गुजरातचा कसाई
पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो गत 15 डिसेंबर रोजी म्हणाले होते -ओसामा बिन लादेन मारला गेला. पण गुजरातचा कसाई अजूनही जिवंत आहे. तो भारताचा पंतप्रधान झाला आहे. भुट्टोंच्या या विधानावर भारताने तीव्र हरकत घेतली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, भुट्टो यांना कदाचित 1971 चा विसर पडला असेल. भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनीही बिलावल एका फेल झालेल्या देशाचे प्रतिनिधी असल्याचा व स्वतःही फेल असल्याची टीका केली होती. अतिरेकी मानसिकता असणाऱ्या लोकांकडून आपण दुसरी अपेक्षा करू शकत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.