आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाक परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो सध्या त्यांच्या भारत दौऱ्यामुळे चर्चेत आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बिलावल भारतात आले व परत गेले. भारत-पाक संबंध टोकाला पोहोचले असताना बिलावल यांच्या रुपात तब्बल 12 वर्षांनंतर प्रथमच एखादा पाकिस्तानी नेता भारत दौऱ्यावर आला. बिलावल यांची गणना पाकच्या मोस्ट एलिजिबल बैचलर्समध्ये होते.
बेनझीर भुट्टो व आसिफ अली झरदारी यांचे लाडके सुपुत्र बिलावल 34 वर्षांचे आहेत. ते त्यांच्या अफेअर्सबद्दल नेहमीच चर्चेत राहतात. पण स्वतः बिलावल यांना लग्नाची कोणतीही घाई नाही. गतवर्षी एका मीडिया इंटरव्ह्यूमध्ये त्यांना लग्नाविषयी छेडण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले होते की, त्यांचा लग्नाचा बेत आहे, पण त्याची कोणतीही घाई नाही.
बिलावल भारतात पोहोचताच त्याच्या आई बेनझीर भुट्टो व पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार सोशल मीडियावर ट्रेंड झाल्या. चला तर मग पाक मीडियामध्ये बिलावल यांचे नाव कोणकोणत्या महिलांशी जोडले गेले ते जाणून घेऊया..
पक्षनेत्याच्या नातीसोबत लग्नाची अफवा
बिलावल यांचे नाव अनेक मुलींसोबत जोडले गेले. 2022 मध्ये, बिलावल यांचे नाव पाकच्या महनूर सूमरो नामक मुलीशी जोडले गेले. दोघांच्या लग्नाच्या अनेक बातम्या आल्या. पाकच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या लग्नाशी संबंधित बातम्या बिनदिक्कतपणे शेअर केल्याने या अफवांनी वेग पकडला. पण महनूरने स्वत: पुढे येऊन या अफवांना पूर्णविराम दिला. महनूर यांनी एक ट्विट केले. त्यात त्या म्हणाल्या - 'कृपया माझ्या लग्नाच्या खोट्या बातम्या देण्यापासून स्वतःला दूर ठेवा. अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी माझ्या पक्षाचे नेते आहेत. 'पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP)' हे आम्हा सर्वांचे कुटुंब आहे! धन्यवाद.'
महनूर राजकारणी कुंटुंबातील आहे. त्यांच्या कुटुंबातील 2 पिढ्या पीपीपीशी संबंधित आहेत. महनूरची आजी रुकिया खानम सूमरो पीपीपीच्या संस्थापक सदस्या व सिंध प्रांताच्या नेत्या होत्या. 28 वर्षीय महनूरही राजकारणात सक्रीय आहेत. त्या आपल्या कुटुंबासह कराचीत राहतात. महनूर यांनी बिलावल यांच्यासोबतचे नाते नाकारले असले तरी, त्या अनेकदा बिलावल यांचे फोटो ट्विटरवर पोस्ट करतात.
पाकच्या सुप्रसिद्ध नायिकेसोबत अफेअरच्या बातम्या
महविश हयातची गणना पाकच्या 'ए लिस्ट' हिरोईन्समध्ये होते. अलीकडेच त्याचे नाव हनी ट्रॅप व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले गेले होते. तत्पूर्वी, 3 वर्षांपूर्वी त्यांचे नाव बिलावल यांच्याशी जोडले गेले होते. दोघांच्या एका जुन्या व्हिडिओमुळे त्यांच्या अफेअरच्या अफवा उठल्या होत्या. तथापि, महविश यांनी एका ट्विटद्वारे या अफेअरची बातमी प्रकाशित करणाऱ्या पोर्टलचा निषेध करून या अफवांना पूर्णविराम दिला.
प्रसिद्ध टिक टॉकर बिलावलसाठी वेडी
टिक टॉकर हरीम शाह हे पाकच्या सोशल मीडियातील एक लोकप्रिय नाव आहे. त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या त्यांच्या व्हिडिओसाठीही ओळखल्या जातात. अलीकडेच त्यांचा एक खाजगी व्हिडिओ लीक झाला होता. हरीमला बिलावल आवडतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावरचे आपले प्रेम व्यक्त करणारा एक व्हिडिओ जारी केला होता. हरीमच्या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये एक गाणे वाजते. त्या फोन स्क्रीनला मिठी मारून बिलावलचा फोटो दाखवत आहे. मला पीपीपी नेता खूप आवडतो, असे ती म्हणाली होती.
भुट्टोंना 24 व्या वर्षी 11 वर्षे मोठ्या नेत्याशी करायचे होते लग्न
2012 मध्ये म्हणजे आजपासून 12 वर्षांपूर्वी बिलावल यांचे नाव हिना रब्बानी खार यांच्याशी जोडले गेले होते. त्या त्यावेळी पाकच्या परराष्ट्र मंत्री होत्या. बिलावल तेव्हा 24 वर्षांचे होते. हिना त्यांच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या होत्या. अफेअरच्या वेळी दोघांमध्ये केवळ वयाचेच अंतर नव्हते, तर हिना विवाहित होत्या. त्यांना 2 मुलेही होती. असे म्हटले जाते की, हिनाच्या पतीच्या अफेअरमुळेच त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली.हिना यांचे पती फिरोज गुलजार यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होते. पतीला रंगेहाथ पकडल्यानंतर हिना आतून कोसळल्या होत्या. त्यावेळी बिलावल यांच्यासोबत त्यांचे नाव जोडले गेले. दोघांचे अफेअर सुरू झाले. हे अफेअर केव्हापासून होते हे कुणालाच माहीत नाही. पण 2012 मध्ये ते उघडकीस आले. बांग्लादेशी टॅब्लॉइड 'ब्लिट्झ'ने एका पाश्चात्य गुप्तचर संस्थेच्या कथित अहवालाचा हवाला देत, पीपीपीचे अध्यक्ष बिलावल हिना खार यांच्याशी लग्न करण्यावर ठाम असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यावेळी हिना आपल्या अब्जाधीश पतीला घटस्फोट देण्याच्या तयारीत होत्या. 'ब्लिट्झ'ने असा दावाही केला की, आसिफ अली झरदारी यांनी आपला मुलगा व हिना यांना राष्ट्रपती भवनात आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.