आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यापेक्षा जास्त संपत्ती त्यांच्या पत्नीकडे आहे. शाहबाज यांच्याकडे सुमारे १० कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्यावर १५ कोटी रुपयांचे कर्ज आहे. शेखुपुरा व लाहाेरमध्ये त्यांच्या मालकीची ६१ एकर जमीन आहे. त्यांचे लंडनमध्येही घर आहे. त्याची किंमत १३ कोटी रुपये आहे. बँक खात्यात २ कोटी रुपये आहेत. शाहबाज यांची पहिली पत्नी नुसरत यांच्याकडे २३ कोटींची संपत्ती आहे.
गुंतवणुकीसह बँकेत २ कोटी रुपये आहेत. माजी पंतप्रधान इम्रान यांच्याकडे दोन लाख रुपये किमतीचे बकरे आहेत. बनिगलामध्ये ३०.३७ एकरांवर बंगला आहे. लाहाेर जमान उद्यानात एक वडिलोपार्जित घर आणि ६०० एकर जमीनही आहे. इम्रान यांच्या नावावर गाडी नाही किंवा परदेशात मालमत्ताही नाही. इम्रान यांच्या बँक अकाउंटवर सुमारे ६ कोटी रुपये आहेत. त्यांची तिसरी पत्नी बुशरा यांच्याकडे एकूण संपत्ती १५ कोटींची आहे. पीपीपी प्रमुख व माजी पंतप्रधान बेनझीर भुत्ताे-झरदारी यांच्या नावे सुमारे दीडशे कोटीची संपत्ती आहे. त्यांच्याकडे परदेशात जास्त संपत्ती आहे. दुबईत बिलावल यांच्या २५ मालमत्ता आहेत. त्याची किंमत सुमारे १.४ अब्ज रुपये आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल यांचे पाकिस्तानात १९ प्लाॅट आहेत. त्यांच्या बँक खात्यावर १२ कोटी रुपये आहेत. बिलावल यांच्याकडे सुमारे ३० लाख रुपयांची शस्त्रास्त्रेही आहेत, असे निवडणूक आयाेगाने स्पष्ट केले.
बेनझीर यांचे पती झरदारींची संपत्ती ७० कोटी
बेनझीर भुत्ताे यांचे पती आसिफ अली झरदारी यांच्या संपत्तीत ४ कोटी रुपयांची वाढ झाली. त्यांची एकूण संपत्ती ७० कोटी रुपये आहे. त्यांच्या मालकीची हजारो एकर शेती आहे. २० घाेडे, शेकडाे उंट, गायी-म्हशी आहेत. त्यांच्याकडे दीड कोटी रुपयांची शस्त्रास्रे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.