आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल-मिलिंडा गेट्स यांचा घटस्फोट:तिन्ही मुलांना पैतृक संपत्तीमधून केवळ 10-10 मिलियन डॉलर मिळणार, ही रक्कम गेट्सच्या एकूण संपत्तीच्या 1 टक्क्यापेक्षाही कमी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा गेट्स वेगळे होणार आहेत. लग्नाच्या 27 वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स एक मुलगा आणि दोन मुलींचे पालक आहेत. मुलाचे नाव रॉरी आणि मुलींचे नाव जेनिफर आणि फिओबी आहे.

बिल गेट्स यांची सध्याची एकूण संपत्ती 146 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 10.87 लाख कोटी रुपये आहे. बिल गेट्स यांनी 2017 मध्ये सांगितले होते की, त्यांच्या प्रत्येक मुलाला पैतृक संपत्तीमधून फक्त 10 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 73 कोटी रुपये दिले जातील. म्हणजेच तिन्ही मुलांना एकूण 30 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती दिली जाईल. बिल आणि मिलिंडा गेट्स यांनी आधीच जाहीर केले आहे की, त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 95% संपत्ती समाजसेवेसाठी दान केली जाईल. यासाठी दोघांनी बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

बिल आणि मिलिंडा गेट्सच्या घटस्फोटावर मुलगी जेनिफरची प्रतिक्रिया
आई-वडिलांच्या घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर मुलगी जेनिफर गेट्स म्हणाली की तिचे कुटुंब एका कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. जेनिफरने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'याक्षणी माझ्या प्रतिक्रिया आणि भावनांसह कुटुंबातील सदस्यांचे समर्थन कसे करावे हे मी शिकत आहे'. जेनिफरने तिच्या पालकांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. जेनिफरने म्हटले आहे की आम्ही आमच्या आयुष्याच्या पुढील टप्प्यात जात आहोत. अशा वेळी आमच्या गोपनीयतेची इच्छा समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

लग्नाचे नाते संपुष्टात, फाऊंडेशनसाठी काम करत राहतील बिल आणि मिलिंडा
सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात बिल आणि मिलिंडा गेट्स म्हणाले की, खूप विचार आणि एकमेकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही आमचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 27 वर्षात आम्ही तीन मुलांना वाढवले आहे.आम्ही एका फाउंडेशनची स्थापना केली आहे, जी जगभरातील लोकांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी कार्य करते. आम्ही अजूनही समान विचार ठेवून या फाउंडेशनसाठी एकत्र काम करू. परंतु आता आम्हाला असे वाटते की येणाऱ्या काळात आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र राहू शकणार नाहीत. आम्ही नवीन सुरुवात करत आहोत.

1994 मध्ये झाले होते लग्न
बिल गेट्स आणि मिलिंडा 1987 मध्ये प्रथम भेटले आणि दोघांनी 1994 मध्ये एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारले. बिल गेट्स जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणले जातात. याशिवाय ते समाजसेवेशी संबंधित असलेल्या कामांसाठीही ओळखले जातात.

बातम्या आणखी आहेत...