आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bill Gates' Divorce Will Affect Many Countries Including India, His Foundation Helps Billions Of Rupees Annually For Health And Society; News And Live Updates

बिल-मिलिंडाच्या घटस्फोटाचा जगावर परिणाम:भारतासह अनेक देशांना बसणार फटका; फाऊंडेशनतर्फे आरोग्य आणि समाजासाठी कोट्यवधी रुपयांची मदत

न्यूयॉर्कएका महिन्यापूर्वीलेखक: मोहम्मद अली
  • कॉपी लिंक
  • जेफ बेजोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांच्याशी या घटस्फोटाची तुलना

जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी विवाहितेची 27 वर्षे घालवल्यानंतर वॉशिंग्टनच्या किंग काउंटी कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. दरम्यान, बिल गेट्स (65 वर्ष) आणि मिलिंडा गेटस (56 वर्ष) यांच्यामध्ये सर्व काही ठीक नसल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट आणि जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला. कारण त्यांना आपल्या कुटुंबासमवेत जास्त वेळ घालवायचा होता.

विशेष म्हणजे बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स यांचे फाऊंडेशन जगभरात कार्यरत असून त्यांनी अशा उपक्रमांवर आतापर्यंत 50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच साडेतीन लाख कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे या घटस्फोटाचा भारतासह अनेक देशांना फटका बसणार आहे.

जेफ बेजोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांच्याशी या घटस्फोटाची तुलना
काही माध्यमांनी या घटस्फोटाची तुलना ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांच्याशी केली आहे. परंतु, हे प्रकरण मायक्रोसॉफ्ट, गेट्स कुटुंब, खाजगी कंपन्या आणि त्यांच्या मालकीशी संबंधित नसून यामुळे भारतासह जगातील कित्येक देशांमध्ये चालू असलेल्या आरोग्यविषयक कार्यक्रम, हवामान बदल धोरण आणि सामाजिक‍ घडामोडींवर होऊ शकतो.

फाऊंडेशनतर्फे दरवर्षी 37 हजार कोटी रुपयांचे दान
फाऊंडेशनतर्फे दरवर्षी परोपकारात 37 हजार कोटींची गुंतवणूक होत असून फाउंडेशनने कोरोनाकाळात जवळपास 8 हजार कोटीं रुपयांची मदत केली. गेल्या वर्षी जगामध्ये आलेल्या कोरोना महामारीला रोखण्यासाठी लस तयार करण्यासाठी बिल गेट्सची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

सोबत काम करत राहणार
बिल गेट्स आणि मिलिंडाने परोपकाराच्या कामात एकमेकांना सहकार्य करत राहणार असल्याचे सांगितले आहे. गेट्स फाऊंडेशनला बफेने कोट्यवधी डॉलर्सची देणगीही दिली आहे. विशेष म्हणजे हयात नसले तरीसुद्धा, त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग या फाऊंडेशनला मिळत राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...