आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:विवाहानंतरही बिल गेट्स फ्लर्ट करायचे! डेटवर जाण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना पाठवायचे ई-मेल

वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायक्राेसाॅफ्टचे संस्थापक व जगातील सर्वात माेठ्या श्रीमंतांपैकी बिल गेट्स यांच्या खासगी जीवनाबद्दलची सनसनाटी माहिती उजेडात आली आहे. बिल गेट्सने मेलिंडा यांच्याशी िववाह केल्यानंतरही ते फ्लर्ट करायचे. २००८ मध्ये महिला सहकाऱ्याला ई-मेल पाठवून डेटवर जाण्यास सांगितले हाेते. या मेलबद्दल माहिती मिळाल्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेट्स यांना इशारा दिला हाेता. मायक्राेसाॅफ्टचे प्रवक्ते म्हणाले, गेट्सने महिला कर्मचाऱ्यास खासगी जीवनाबद्दल ई-मेल पाठवला हाेता. बिलने महिला कर्मचाऱ्याला कार्यालयाबाहेर भेटण्यास सांगितले हाेते. ई-मेलबद्दल माहिती मिळाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेट्स यांना त्यांच्या वर्तनाबद्दल इशारा दिला हाेता. काेणत्याही महिला कर्मचाऱ्याला अशा प्रकारे ई-मेल पाठवणे याेग्य नाही. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या संचालक मंडळातील काही सदस्यांनादेखील याबद्दलची कल्पना दिली हाेती.

२७ वर्षांचा विवाह माेडला, मेलिंडा यांच्याशी घटस्फाेट
बिल गेट्स व मेलिंडा यांचा १९९४ मध्ये विवाह झाला हाेता. आॅगस्ट २०२१ मध्ये बिल व मेलिंडा यांच्यात आैपचारिक पातळीवर घटस्फाेट झाला. २७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर तीन मे राेजी घटस्फाेटाचा अर्ज दाखल करण्यात आला हाेता. बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनने दाेन दशकांच्या काळात जागतिक आराेग्य व कल्याणकारी कार्यावर साडेतीन लाख काेटी रुपयांहून जास्त खर्च केले.

बातम्या आणखी आहेत...