आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल गेट्स बनले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी:18 राज्यांमध्ये  2.42 लाख एकर शेती केली खरेदी, 1251 कोटी रुपये केले खर्च; एकूण 2.69 लाख एकरचे मालक

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'डेली मेल' वृत्तपत्राच्या लँड रिपोर्ट-2020 मधून ही माहिती समोर आली आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स अमेरिकेचे 'सर्वात मोठे शेतकरी' देखील बनले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या 18 राज्यांमध्ये एकूण 2 लाख 42 हजार एकर शेत जमीन खरेदी केली आहे.

'डेली मेल' वृत्तपत्राच्या लँड रिपोर्ट-2020 मधून ही माहिती समोर आली आहे. यानुसार गेट्स यांनी केवळ शेती योग्य जमिनीच गुंतवणूक केलेली नाही तर दुसऱ्या ठिकाणच्या जमिनीही त्यांनी खरेदी केल्या आहेत. यामध्ये हॉर्स हॅवेन हिल्स क्षेत्रात खरेदी केलेल्या 14,500 एकर जमिनीचाही समावेश आहे. यासाठी त्यांनी 1,251 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशा प्रकारे सर्व मिळून त्यांनी आतापर्यंत 2,68,984 एकर जमिन खरेदी केली आहे.

मात्र हे आतापर्यंत पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही की, 65 वर्षांच्या बिल गेट्स यांनी एवढी कृषी भूमी का खरेदी केली आहे. मात्र एवढी माहिती मिळाली आहे की, त्यांनी जमिनी सरळ आणि पर्सनल 'इन्वेस्टमेंट एंटिटी कास्केड' फर्मच्या माध्यमातून खरेदी केल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, बिल गेट्स यांनी 2018 मध्ये जेव्हा ही जमीन खरेदी केली होती त्यावर्षी अमेरिकेत सर्वात जास्त किंमतींनी खरेदी करण्यात आली होती.

बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने 2008 मध्ये एक महत्त्वाची घोषणा केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, ते अफ्रिका आणि जगातील इतर विकसनशील क्षेत्रात छोट्या मोठ्या शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी 2,238 कोटी रुपयांची मदत करत आहे, ज्यामुळे छोटे शेतकरी भूक आणि गरीबीतून बाहेर येऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...