आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते पोळ्या लाटताना व त्यावर तूप लावून खाताना दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकन शेफ एटन बर्नथही आहेत.
शेफ एटन बर्नथ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते बिल गेट्स यांना पोळ्या बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत. तसेच आपण या पोळ्या कुठे व कसे शिकलो हे ही त्यांना सांगत आहेत.
व्हिडिओत काय दिसत आहे...
व्हिडिओच्या सुरुवातीला शेफ एटन जगातील चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स यांची ओळख करवून देताना दिसून येत आहेत. त्यानंतर ते गेट्स यांना नवी डिश म्हणजे पोळ्यांची माहिती देतात. त्यानंतर गेट्स चमच्याने पीठ मळून पोळ्या लाटताना दिसून येतात.
व्हिडिओत शेफ एटन बर्नथ सांगतात की, त्यांनी आपल्या भारत दौऱ्यात बिहारमध्ये पोळ्या बनवण्याचे तंत्र शिकले. ते म्हणाले - मी भारताच्या बिहारमध्ये गव्हाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटलो होतो. तिथे मी 'दीदी की रसोई' कँटीनमध्ये काम करणाऱ्या काही महिलांकडून पोळ्या बनवणे शिकलो.
सोशल मीडियावर गंमतीदार प्रतिक्रिया
बिल गेट्स यांचा हा व्हिडोओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत. एका यूजरने कमेंट केली- लव्ह फ्रॉम इंडिया. आणखी एका युजरने गंमतीने लिहिले - मी यापेक्षा चांगल्या रोट्या बनवतो. मला कामाला ठेवा. दुसर्या यूजरने लिहिले - ते चांगले दिसत आहे. अन्य एका यूजरने गंमतीत लिहिले - हा व्हिडिओ चांगला आहे. पण त्यात रोटी कशी बनवू नये हे सांगण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.