- Marathi News
- International
- Bin Laden Attacked The WTC And The Pentagon By Making 4 Passenger Planes Missiles, 3000 People Were Killed; President Bush Kept Flying For Hours Till The Danger Was Averted; News And Live Updates
फोटोत पहा 9/11चा दहशतवादी हल्ला:लादेनने 4 प्रवासी विमानाने क्षेपणास्त्र बनवून WTC आणि पेंटागॉनवर केला होता हल्ला, 3000 लोकांचा मृत्यू; धोका टळेपर्यंत राष्ट्रपतींची हवेतच भरारी
जगातील सर्वात मोठा हल्ला म्हणून 9/11 कडे पाहले जाते. मुजाहिदीन ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर जगातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात हजारो लोक मृत्यूमुखी पडले असून अनेक लोक गंभीर जखमी झाले होते. हा हल्ला अमेरिकन लोकांच्या मनावर कायमचा छापला गेला आहे.
जगाने यापूर्वी अनेक हल्ले पाहिले होते. परंतु, असा हल्ला पहिल्यांदाचा पाहिला होता. अमेरिकेच्या तीन विमानतळांवरून उड्डाण केलेली चार विमाने ओसामाच्या दहशतवाद्यांनी हायजॅक केली. यापैकी, बोस्टनमधून उडणारी दोन विमानाचे क्षेपणास्त्र बनवून 18 मिनिटांच्या अंतराने मॅनहॅटनमधील वर्ल्ड ट्रेड टॉवर्सला उडवले.
धोका टळेपर्यंत राष्ट्रपतींची हवेतच भरारी
हा हल्ला इतका भयावह होता की, अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज बुश धोका टळेपर्यंत तासनतास हवेतच उड्डाण घेत होते. दरम्यान, F-16 लढाऊ विमानाला त्याच्या सुरक्षितेसाठी लावण्यात आले होते. या भयावह दहशतवादी हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 20 फोटोमध्ये आपण या हल्ल्याची परिस्थिती पाहू शकता.
11 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाच्या दहशतवाद्यांनी प्रवासी विमानांचे क्षेपणास्त्र बनवून अमेरिकेच्या सर्वात मोठ्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर (डब्ल्यूटीसी) च्या दोन्ही टॉवर्सवर हल्ला केला. या हल्ल्यांसाठी अमेरिकेच्या तीन विमानतळांवरून चार प्रवासी विमाने अपहरण करण्यात आली होती. पहिले विमान डब्ल्यूटीसीच्या उत्तर टॉवरला धडकल्यानंतर 17 मिनिटांनी, दुसरे विमान दक्षिण टॉवरला धडकणार होते. हा फोटो यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या एका कर्मचाऱ्याने काढला आहे.
11 सप्टेंबर 2001 च्या सकाळी हल्ल्याच्या 49 मिनिटांनंतर डब्ल्यूटीसीचे दोन्ही टॉवर कोसळले. जवळपासच्या अनेक लहान इमारती देखील यामुळे नष्ट झाल्या. अशाच एका इमारतीसमोर एक अग्निशामक दलाचा कर्मचारी उभा आहे. हा फोटो यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या एका कर्मचाऱ्यानेही घेतला होता. सिक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्याने गेल्या दोन दिवसात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अशी अनेक न पाहिलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
भीषण दहशतवादी हल्ल्याने डब्ल्यूटीसीचे दोन्ही टॉवर्सच नाही तर जवळपासच्या अनेक इमारतीही नष्ट झाल्या. आग इतकी भीषण होती की, ट्विन टॉवरच्या ढिगाऱ्यात 3 महिने आग पेटत राहिली. असे असूनही, न्यूयॉर्क पोलिस विभागाचे कर्मचारी कित्येक दिवस झोपल्याशिवाय लोकांना भंगारातून वाचवण्याचा प्रयत्न करत राहिले. मात्र, आगीमुळे बहुतांश लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेच्या गुप्त सेवेनेही हे चित्र जारी केले आहे.
यूएस सिक्रेट सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीने 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वर्ल्ड ट्रेड टॉवर (डब्ल्यूटीसी) कोसळल्याचे हे चित्र त्याच्या विभागाला दिले. जगाने प्रथमच डबघाईला आलेले डब्ल्यूटीसीचे असे चित्र पाहिले.
9/11 च्या हल्ल्याचे हे चित्रही प्रथमच जगासमोर आले आहे. चित्रात, यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या न्यूयॉर्क फील्ड ऑफिसच्या तळघरात पार्क केलेली आर्मर्ड लिमोझिन वाहने दिसत आहेत. हे कार्यालय WTC च्या जवळ होते.
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (WTC) दोन्ही टॉवरवरील अनेक मजल्याला आग लागली. या दरम्यान, एकाने जीव वाचविण्यासाठी उत्तर टॉवर उडी मारली. चित्रात आणखी एक माणूस खिडकीतून बाहेर पाहताना दिसत आहे.
11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड टॉवर (डब्ल्यूटीसी) वर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे त्याच्या उत्तर टॉवरमधून धूर वेगाने वाढू लागला. यापूर्वी सकाळी 9:59 वाजता दक्षिण टॉवर कोसळले आणि उत्तर टॉवर अगदी 2 मिनिटांनी कोसळले.
डब्ल्यूटीसीचे दोन्ही टॉवर कोसळल्यानंतर लोक आपल्या जीव वाचवण्यासाठी धावत होते. या दरम्यान बरेच लोक इतरांना पाठिंबा देताना दिसले. टेलिव्हिजनवर थेट प्रसारित झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते.
एडवर्ड फाइन नावाचा हा माणूस WTC चा पहिला टॉवर कोसळल्यानंतर काँक्रिटच्या धूळातून बाहेर आला. माती आणि धूळाने पूर्णपणे मळलेला एडवर्डने आपले नाक आणि तोंड रुमालाने झाकले. नॉर्थ टॉवर कोसळण्यापूर्वीच तो बाहेर आला.
हायजॅक करण्यात आलेल्या 4 विमानांपैकी तिसऱ्या विमानाने वॉशिंग्टन डीसीजवळील डल्स विमानतळावरून उड्डाण केले. काही वेळानंतर दहशतवाद्यांनी पेंटागॉन इमारतीच्या नैऋत्य भागात तो कोसळला. या हल्ल्यात 184 लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा समावेश होता.
हा फोटो 9/11 च्या हल्ल्यानंतर एका गुप्त सेवेच्या कर्मचाऱ्यानेही काढला होता. यात डब्ल्यूटीसीचे दोन्ही टॉवर अपहरण झालेल्या विमानांचा टकराव झाल्यानतंर दिसत होते. सिक्रेट सर्व्हिसने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे चित्र शेअर केले आहे.