आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लस मुलांसाठी सुरक्षित:फायजरने म्हटले- आमची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी 100% परिणामकारक, मुलांवर कोणत्याच प्रकारचा साइड इफेक्ट नाही

बर्लिन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
लसीकरणादरम्यान भारतीय वंशाचा 12 वर्षीय अभिनवने फायजरची लस घेतली - Divya Marathi
लसीकरणादरम्यान भारतीय वंशाचा 12 वर्षीय अभिनवने फायजरची लस घेतली
  • 2 ते 5 वर्षीय मुलांवर ट्रायल्स सुरू करण्याची योजना

कोरोना लस तयार करणारी फार्मा कंपनी फायजर-बायोएनटेकने दावा केला आहे की, त्यांची लस 12 ते 15 वर्षांच्या मुलांवर 100% परिणामकारक आहे. CNN ने सांगितल्यानुसार, कंपनीने बुधवारी म्हटले की, अमेरिकेत 2,250 मुलांवर झालेल्या फेज थ्री ट्रायल्समध्हे ही लस 100% परिणामकारस असल्याचे सिद्ध झाले आहे. दुसरा डोस दिल्याच्या एका महिन्यानंतर त्यांच्या शरीरात चांगला अँटीबॉडी रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.

भारतीय वंशाच्या अभिनवने घेतली लस

व्हॅक्सीनचे ट्रायल्स ऑक्टोबर 2020 मध्ये सुरू झाले होते. याचे परिणाम आता समोर आले आहेत. या लसीकरणादरम्यान भारतीय वंशाचा 12 वर्षीय अभिनवने फायजरची लस घेतली होती. तो कोरोना व्हॅक्सीन घेणाऱ्या सर्वात कमी वयांच्या मुलांमध्ये सामील आहे. त्याचे वडील शरत डॉक्टर असून, कोव्हिड व्हॅक्सीनच्या ट्रायल्समध्ये सामील होते. अभिनवने अमेरिकेतील सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये लस घेतली.

2 ते 5 वर्षीय मुलांवर ट्रायल्स सुरू करण्याची योजना

कंपनीने मागच्या महिन्यात 6 महीन्यांपासून 11 वर्षापर्यंतच्या मुलांना लस घेण्यासाठी फेज 1,2,3 च्या क्लिनिकल ट्रायलचा अभ्यास सुरू केला आहे. यादरम्यान, 5 ते 11 वर्षांच्या मुलांना पहिला डोस देण्यात आला. कंपनी पुढच्या आठवड्यापासून 2 ते 5 वर्षांच्या मुलांना लस देण्याच्या तयारीत आहे.

बातम्या आणखी आहेत...