आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहार्वर्ड विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाने नागरिकांच्या मनात येणाऱ्या आत्महत्येचा विचारांचा अंदाज बांधणारी एक नवी पद्धत विकसित केली आहे. मानसशास्त्रज्ञांकडे येणाऱ्या काही लोकांवर त्यांनी याचा प्रयोगही सुरू केला आहे.
संशोधक बायोसेन्सर डेटाच्या माध्यमातून व्यक्तीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार केव्हा व कोणत्या स्थितीत येतो हे धुंडाळण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी त्यांनी निवडक लोकांच्या स्मार्टफोनमध्ये काही अॅप्स टाकलेत. तसेच त्यांच्या हातावरही डिजिटल बँड बांधला आहे. यामुळे संशोधकाना त्या लोकांच्या दिवसभरातील हालचालींवर नजर ठेवता येईल.
GPS च्या माध्यमातून ट्रॅकिंग
केटलिन क्रूज नामक युवतीचाही या प्रयोगात समावेश करण्यात आला आहे. केटलिन काही दिवसांपूर्वीच मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेऊन घरी परतील. आता संशोधक जीपीएसच्या माध्यमातून ट्रॅक करून ती घराबाहेर पडते की नाही, पडते तर किती वेळ बाहेर राहते, तिचा पल्स रेट किती राहतो, तो कोणत्या वेळी वाढतो व कमी होतो, यावर नजर ठेवत आहेत. डिजिटल बँडच्या माध्यमातून केटलिनच्या झोपेवरही नजर ठेवली जात आहे. झोपल्यानंतर तिची कितीवेळा झोपमोड होते हे ही संशोधक तपासणार आहेत.
काय सांगते GPS व डिजिटल बँड?
संशोधकांच्या चमूशी संबंधित मानसशास्त्रज्ञ मॅथ्यू नॉक सांगतात की, या सर्वच गोष्टींचा अभ्यास केला जाईल. त्यातून आम्हाला समोरचा आत्महत्येचा विचार करत आहे किंवा नाही हे समजण्यास मदत होईल. यामुळे त्याला वेळीच वाचवता येईल. नॉक यांच्या मते, एखाद्याची वारंवार झोपमोड होत असेल, तर त्याचा अर्थ त्याचा मूड चांगला नाही.
तसेच जीपीएसमुळे तो वारंवार घरात फिरत असल्याचे लक्षात येईल. त्यावरून आपल्याला त्याला राग येत असल्याचे समजेल. अशा प्रकारे सेन्सर रिपोर्ट तयार होऊन व्यक्ती परेशान आहे किंवा नाही हे समजते. यामुळे त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त करता येईल.
प्रश्नावलीनेही मनस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न
संशोधक रुग्णांना वेळोवेळी प्रश्नावली पाठवतात. त्यातूनही मनोरुग्णांच्या स्थितीचा अंदाज घेता येतो. तसेच त्यांना कोणत्या गोष्टी योग्य व कोणत्या गोष्टी अयोग्य वाटत आहेत हे ही समजते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, जगभरात दर 40 सेकंदांना एक व्यक्ती आत्महत्या करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.