आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Bipin Rawat Update; Chief Of Defence Staff (CDS) General Warning To China Pakistan Over Line Of Actual Control (LAC)

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन-पाकिस्तानला इशारा:CDS रावत म्हणाले - चीनच्या हालचालींना सैन्य सडेतोड उत्तर देत आहे, बालाकोट स्ट्राइक पाकिस्तानला कठोर इशारा होता

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमध्ये प्रॉक्सी वॉर सुरू केले आहे'

सीमा वादावर भारत-चीनच्या बातचितदरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)बिपिन रावत यांनी शुक्रवारी एका वेबिनारमध्ये बोलताना म्हटले की, लडाखमध्ये भारत-चीन सिमेवर तणाव कायम आहे. रावत म्हणाले की, लडाखमध्ये चीन आर्मीच्या चुकीच्या हालचालींना भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत आहे. आपला उद्देश क्लिअर आहे. आपण लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC) च्या स्थितीमध्ये कोणताही बदल होऊ देणार नाही.

राउत म्हणाले की, बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक पाकिस्तानसाठी कठोर संदेश होता की, भारतामध्ये दहशतवादी पाठवले तर सोडणार नाही. दहशतवादापासून निपटण्यासाठी भारताने नवीन पध्दतीने पाकिस्तानची चिंता वाढवली आहे.

'पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमध्ये प्रॉक्सी वॉर सुरू केले आहे'
रावत म्हणाले की, सीमेवर अनावश्यक कारवाईमुळे होणाऱ्या मोठ्या संघर्षांकडे कोणी दुर्लक्ष करू शकत नाही. रावत यांनीही पाकिस्तानवर निशाणा साधला. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने प्रॉक्सी युद्ध सुरू केले आहे, त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत.

भारत-चीन चर्चा सुरूच आहे
सीमा वाद सोडवण्यासाठी भारत-चीन कोर्प्स कमांडर यांच्यात आज पूर्व लडाखच्या चुशुल भागात 8 व्या राउंडची बातचित होत आहे. पूर्वीच्या बैठकींमध्ये तणाव कमी करण्यासाठी आणि एलएसीची स्थिती बदलू नये यावर सहमती दर्शवली गेली होती, परंतु चीन वारंवार अटी मोडत आहे.

लडाखमध्ये भारत-चीनमध्ये एप्रिलनंतर तणाव कायम आहे. 15 जूनमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनचेही 40 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. यानंतर तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आर्मी आणि डिप्लोमेटिक लेव्हलच्या अनेक मीटिंग्स झाल्या, परंतु चीन वारंवार आपल्या चर्चेतून माघार घेतो.

29-30 ऑगस्टच्या रात्री चीनने लडाखमध्ये एका पहाडावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र सैन्याने त्यांना हा प्रयत्न हाणून पाडला. यानंतरही चीन घुसखोरीचा प्रयत्न करत राहिला, मात्र भारतीय जवानांपुढे त्यांना प्रत्येक वेळी मागे हटावे लागले. चीनच्या हालचाली पाहता भारताने लडाखच्या वादग्रस्त भागांमध्ये जवान वाढवले आहेत.