आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Birds In The Mediterranean Are More Colorful Than Polar Birds, According To Darwin's 200 year old Theory Of Bird Color

सत्य:डार्विनने 200 वर्षांपूर्वी मांडलेल्या पक्ष्यांच्या रंगबदल सिद्धांतावर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे झाले शिक्कामोर्तब, ध्रुवीय पक्ष्यांच्या तुलनेत भूमध्य सागरी क्षेत्रातील पक्षी जास्त रंगीबेरंगी

न्यूयॉर्क4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माकडापासूनच मानव उत्क्रांत झाला. हा सिद्धांत मांडणारे संधक चार्ल्स डार्विन यांनी २०० वर्षांपू्र्वी १८ व्या शतकात लाँग हेल्ड थिअरी मांडली होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) केलेल्या परीक्षणात त्यावर शिक्कामोर्तब झाले. भूमध्य सागर क्षेत्राच्या परिसरातील पक्षी जास्त रंगीबेरंगी असतात, असे डार्विनने सांगितले होते. ध्रुवाच्या दिशेने गेलेल्या पक्ष्यांचा रंग भुरकट किंवा जास्त गडद होऊ लागताे. या सिद्धांताच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी स्टेनफाेर्ड विद्यापीठातील बायाेसायन्स विभागाचे डाॅ. चरिस कुने व डाॅ. गाेविन थाॅमसने नेचर हिस्ट्री संग्रहालयातील ४ हजार ५२७ प्रजातींच्या २४ हजार ३४५ पक्ष्यांच्या नमुन्यांचे अध्ययन करण्यात आले. त्यासाठी वेगवेगळ्या स्थितीमधील पक्ष्यांची छायाचित्रे घेण्यात आली होती. त्यानुसार भूमध्य सागरी क्षेत्रातील पक्ष्यांचा रंग ध्रुवीय पक्ष्यांच्या तुलनेत जास्त गडद असल्याचे दिसून आले. यामुळे जैवविविधतेला जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे. १९ व्या शतकातही काही संधकांनी अशाच प्रकारचा दावा केला होता. परंतु आतापर्यंत त्याला काेणीही पुष्टी दिलेली नव्हती. भूमध्य सागर क्षेत्रातील पक्षी रंगीबेरंगी असतात, हेच आपल्याला ठाऊक होते. नव्या संधनात या भागातील मादी पक्ष्यांचा रंग जास्त गडत असल्याचे दिसून आले. नर पक्ष्यांचा रंग तुलनेने फिकट स्वरूपाचा असताे. अमेरिकेतील काही प्रजाती म्हणजे पासेर्निया सायरस, ब्लू, येलाे, ग्रीन व रेड नावाचे पक्षी याला अपवाद ठरतात.

दोन दशकांपूर्वी चोरीस गेलेली डायरी सापडली
१८५९ मध्ये ओरिजिन ऑफ स्पेसिज नावाच्या डार्विनची नाेटबुक केंब्रिज विद्यापीठातील ग्रंथालयातून दोन दशकांपूर्वी तेथून गायब झाली. मंगळवारी ग्रंथालयाच्या इमारतीबाहेर एका बॅगेत ही नाेटबुक आढळून आली होती. त्यात ग्रंथपालास ईस्टरच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...