आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्वानाचे मीम टि्वटर लोगो झाल्यामुळे टि्वटरला फायदा होईल की नुकसान हे नंतर कळेल, परंतु यामुळे क्रिप्टो चलन डॉजकॉइनमध्ये तेजी आली आहे. मंगळवारी डॉजकॉइनने अचानक ३० टक्के उसळी घेतली. या उलट सर्वात जुने आणि लोकप्रिय क्रिप्टो टोकन बिटकाॅइनच्या मूल्यात १.०३ टक्के घसरण झाली. बाॅययूकॉइननुसार, बिटकॉइनचे मूल्य २३,३७,४५९ रुपये घसरून २३,१३,३५५ रुपये झाले आहे. बिटकॉइनचे बाजार मूल्य एकूण ४४.९ लाख कोटी रुपये आहे.
डॉजकॉइन क्रिप्टो चलनाचे प्रतीक म्हणून श्वानाचे चिन्ह आहे, तर टि्वटरच्या वेब ब्राऊजरमध्ये सर्वात वरती उजव्या बाजूला आणि होम बटणवर आधी निळ्या पक्षाचे चिन्ह होते. रातोरात ते ‘शीबा इनू’च्या कार्टूनमध्ये बदलण्यात आले. ते एक श्वानाचे मीम आहे. यामुळे शीबा इनूची संकल्पना असलेल्या डॉजकॉइनचे मूल्य ६.५० रुपये वाढून ८.११ रुपये झाले. त्याचे बाजार मूल्य १.१ लाख कोटी रुपये आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.