आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका:बायडेन-ट्रम्प यांच्यात सिनेट आणि हाऊसमध्ये आताही कडवी झुंज

वॉशिंग्टन5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक आणि ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीमध्ये बहुमतासाठी कडवी झुंज सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत हाऊस ऑफ रिप्रेझंेटेटिव्हमध्ये बायडेन यांच्या पक्षाने १८४ तर ट्रम्प यांच्या पक्षाने २०७ जागा जिंकल्या आहेत. ४३५ जागा असणाऱ्या हाऊसचा बहुमताचा आकडा २१८ आहे. सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्ष ४८-४८ जागांवर आहे. सिनेटचा बहुमताचा आकडा ५१ आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जनतेने रिपब्लिकन पक्षाच्या कथित लहरीच्या दाव्याला झिडकारल्याचे सांगितले आहे. हे निकाल लोकशाहीसाठी चांगले संकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...