आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारा कायद्याअंतर्गत चौकशीची कारवाई:अमेरिकेत लॉबिंग करणारे भाजपचे सहकारी-संघटन चौकशी फेऱ्यात; भारतीय अमेरिकींविरोधात चौकशी सुरू

वॉशिंग्टन / यशवंत राज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपासाठी अमेरिकेत काम करणारे त्यांचे भारतीय वंशाचे मित्र, हितचिंतक अमेरिकी तपास संस्थेच्या जाळ्यात आले आहेत. अनेक भारतीय अमेरिकींविरोधात चौकशी सुरू झाल्याचे मानले जात आहे. यामध्ये मोदी यंाचे जुने मित्र आणि समर्थक असल्याचा दावा करणारा एक व्यक्तीही आहे. त्यांनी मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्याशी संबंधित भारतीयवंशजांच्या अनेक सभांमध्ये प्रमुख भूमिका बजावली.

कारवाई फॉरेन एजेंट रजिस्ट्रेशन कायद्याअंतर्गत(फारा) हाेत आहे. या कायद्याअंतर्गत विदेशी सरकार किंवा शाखेसाठी काम करणाऱ्या अमेरिकी आणि त्यांच्या संघटनेस विदेशी एजंटच्या रूपात नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र, अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या प्रवक्त्याने दोन भारतीय अमेरिकींच्या फारा कायद्याअंतर्गत चौकशीस दुजोरा किंवा नकार दिला नाही. भारतीयांमध्ये या कारवाईबाबत घबराट आहे. संघटनांच्या हालचालींशी संबंधित काही लोकांनी “भास्कर’शी चर्चेत सांगितले की, आता आपल्या कामाबाबत सतर्कता बाळगत आहोत. फाराअंतर्गत २ वर्षांत भारतीय अमेरिकींच्या २ संघटनांनी आपली नोंदणी केली आहे.

कायद्याअंतर्गत कारवाईच्या दबावात जुलैमध्ये नोंदलेली संघटना इथोस फाउंडेशन( भारतीय फाउंडेशन म्हणून ओळख असलेली) दुसरी आहे.टेक्सास स्थित संघटनेने आपल्या विवरणात सांगितले की, भारतातील हैदराबाद शाखेसाठी काम करत आहे. भाजप प्रवक्ते किशोर पाेरेड्डी यांच्यासोबत त्यांचा संपर्क आहेे.याचा उद्देश एनआरआयशी संवाद करणे आणि त्यांचा देश भारतासंदर्भात राजकीय जागरुकता निर्माण करणे आहे. इथोस फाउंडेशनने सांगितले की, त्यांचे काम आपली विदेशी संघटन भजापला अमेरिकेत स्थायिक भारतीयांचा विश्वास संपादन करणे आहे. याआधी ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी-यूएसएने ऑगस्ट २०२० मध्ये नोंदणी केली होती. त्यांच्या तीन पदाधिकाऱ्यांचीही नोंदणी केली होती. त्यात अडपा व्ही.प्रसाद संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. सप्टेंबरमध्ये विदेशमंत्री जयशंकर त्यांच्या कार्यक्रमास हजर होते.

वाद: रॅलीत बुलडोझर आणले, एफबीआय चौकशीची मागणी मुस्लिम,अफ्रिकी अमेरिकी परोपकारी गटाने केली होती बुलडोझरवर टीका स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या रॅलीत बुलडोझरचा वापर केल्याने ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी वादात अडकली होती. मुस्लिम ,अफ्रिकी अमेरिकीच्या परोपकारी गटांनी टीका केली की, भारतात अल्पसंख्यकांच्या दमनाचे प्रतिक आहे. त्यांनी भारताच्या कट्टरपंथी राजकीय हालचाली वाढण्याची सीआयए व एफबीआय चौकशीची मागणी केली आहे.

अमेरिकेत लाॅबिंग पूर्णपणे वैध, मात्र त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे अमेरिकेत नागरिकांना विदेशी सरकारे आणि शाखांसाठी लॉबिंग करणे कायदेशीर आहे. त्यांना नोंदणी करणे अनिवार्य असते. तिमाही आधारावर आपल्या हालचाली आणि फिसची माहिती द्यावी लागते. बीजीआर गव्हर्नमेंट अफेयर्स भारत सरकारसाठी लॉबिंग करते. ऑक्टाे.२०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ६ महिन्यांत त्याने भारत सरकारकडून ३ लाख डॉलर(२.४ कोटी रु.) फिस घेतली अाहे.

बातम्या आणखी आहेत...