आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकृतीचा नवा फाॅर्म्युला:रक्त तपासणीतून कॅलेंडर एज -आयएजमधील फरक समजणार, गंभीर आजारांचा धोका टाळता येणे शक्य!

वाॅशिंग्टन7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण आपल्या वयाची गणना कॅलेंडर किंवा वर्षासाेबत करताे. वय वाढत जाते तसे आजाराची शक्यताही वाढू लागते. कमी वय असते तेव्हा आजारी पडण्याची शक्यता कमी मानली जाते. लिकेन स्टॅनफाेर्ड युनिव्हर्सिटी व बक इन्स्टिट्यूट फाॅर रिसर्च आॅन एजिंगने रक्त तपासणीची नवी पद्धती शाेधून काढली. त्यानुसार काेणत्याही व्यक्तीचा कॅलेंडरवरील वयाशी स्वत:च्या वयाचा संबंध जाेडला जाताे. कॅलेंडर एज व आयएजमध्ये फरक पाहता येतो. संशाेधकांनी या नव्या पद्धतीला आयएज असे नाव दिले आहे. दाह, वेदना किंवा जुनाट आजार उदाहरणार्थ- हृदयराेग किंवा मधुमेह.

रक्ताच्या तपासणीतून संशाेधक रक्तातील कायटाेकिन्स व इम्युन सिस्टिम प्राेटीनचे अध्ययन करतात. रक्त तपासणीनंतर व्यक्तीचे कॅलेंडर एज ४५ वर्षे व आयएज ६५ वर्षे आल्यास व्यक्तीचे शरीर २० वर्षे जास्त वृद्ध आहे. शरीरातील दाह किंवा जुन्या आजारामुळे हे घडून येते. अशा व्यक्तीला जास्त दक्षता घेण्याची गरज आहे. त्यातही संबंधित व्यक्तीला हृदयराेगासंबंधी आजार, मधुमेह- टाइप टू याविषयी दक्षता बाळगली पाहिजे.

धूम्रपान करणे, व्यायामाचा अभाव दीर्घायूमधील सर्वात मोठे अडथळे
स्टॅनफाेर्ड विद्यापीठातील प्राे. नाजिश सय्यद म्हणाले, आपल्या सगळ्याचे वय वाढले आहे. आपण मृत्यूच्या दिशेने जाताे. परंतु आपले वय कशा प्रकारे वाढते याला जास्त महत्त्व आहे. वय वाढत असताना आपण किती निराेगी राहू ही गाेष्ट नव्या रक्त तपासणीतून स्पष्ट हाेणार आहे. कॅलेंडर व आयएजमध्ये फरक दिसून आल्यास दक्ष हाेण्याची गरज असते. धूम्रपान करणे, व्यायाम न करणे आणि खानपानमध्ये बेपर्वाई केल्याने आयएज वाढते. निराेगी दिनचर्येतून यात सुधारणा केली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...