आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुरोपातील अनेक देशांतील युक्रेनच्या दूतावासांना संशयास्पद पार्सल मिळाले आहेत. त्यांना ब्लडी पार्सल म्हटले जात आहे. CNNच्या वृत्तानुसार, युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दमित्रो कुलेबा यांनी या पार्सलमध्ये प्राण्यांचे अवयव असल्याचे सांगितले आहे. तसेच अधिकाऱ्यांना घाबरवण्यासाठी असे केले जात असल्याचेही ते म्हणालेत.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दमित्रो कुलेबा म्हणाले - युरोपातील आमच्या वेगवेगळ्या देशांतील दूतावासांना प्राण्यांचे अवयव असणारे पार्सल मिळाले आहेत. आतापर्यंत अशा 17 घटना घडल्या आहेत. अनके पार्सल्समध्ये गाय व डुकरांचे डोळे आढळलेत. तर काही पार्सलमध्ये स्फोटकेही आढळलेत.
स्पेनमधील दूतवासाबाहेर पार्सल उघडताच स्फोट
संशयास्पद पार्सल मिळण्याची मालिका स्पेनमधील दूतावासाबाहेर झालेल्या एका स्फोटापासून सुरू झाली. काही दिवसांपूर्वी स्पेनची राजधानी माद्रिदमधील युक्रेनियन दूतावासात स्फोटकांनी भरलेले अनेक पार्सल पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक पाकिट उघडताच स्पोट झाला होता. हा लेटर बॉम्ब स्पेनच्या एअर फोर्स बेसवर पाठवण्यात आला होता.
लेटर बॉम्ब व्यक्तीची हत्या करण्यासाठी वापरला जातो. अनेक गुप्तहेर यंत्रणा एखाद्या हायप्रोफाइल व्यक्तीची हत्या करण्यासाठी ही ट्रिक वापरतात. लेटर बॉम्ब बनवण्यासाठी एक पार्सल तयार केले जाते. त्यात एक स्फोटक उपकरण लावले जाते. पार्सल उघडताच डिव्हाइस ट्रिगर होऊन स्फोट होतो.
माद्रिदमध्ये झालेल्या स्फोटात युक्रेनचा एक मुत्सदी जखमी झाला होता.
येथे मिळाले होते संशयास्पद पॅकेज
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ओलेह निकोलेंको यांच्या माहितीनुसार, हंगेरी, नेदरलँड, पोलंड, क्रोएशिया, इटली, ऑस्ट्रिया स्थित युक्रेनच्या दूतावास व नेपल्स व क्राको स्थित युक्रेनच्या काउंसलेटमध्ये संशयास्पद पाकिटे आढळली होती. त्यात स्फोटकांसह प्राण्यांचे अवयवही होते. ते म्हणाले - पाकिट दूतावासाला पाठवण्यापूर्वी एखाद्या द्रवात भिजवण्यात आल्याचे दिसून येत आहे. कारण, त्याचा विचित्र वास येत आहे. आमचा तपास सुरू आहे.
रशियावर पार्सल पाठवण्याचा आरोप
सद्यस्थितीत हे पार्सल नेमकी कुणी पाठवले हे स्पष्ट झाले नाही. पण युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रशियावर यासंबंधीचा आरोप केला आहे. दमित्रो कुलेबा म्हणाले - आमच्या मुत्सद्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियावर दबाव निर्माण केला आहे. रशियाला आतापर्यंत युद्धात विजय मिळाला नाही. अनेक शहरांतील रशियन सैनिकांनी माघार घेतली आहे. डिप्लोमॅटिकली पाहिले तर रशियाचा या युद्धात पराभव झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.