आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉशिंग्टन:पाकिस्तानला झटका; अमेरिकेच्यादहशतवादी यादीत ‘लष्कर’ कायम, ग्रे यादीत असल्याने मदत कठीण

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानला झटका; अमेरिकेच्या दहशतवादी यादीत ‘लष्कर’ कायम

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक दलाच्या (एफएटीएफ) ग्रे लिस्ट बाहेर पडण्यासाठी कारवाईचा दिखावा करणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने झटका दिला आहे. पाकिस्तानला आपला गड बनवलेल्या लष्कर-ए-तोयबाला अमेरिकेने परदेशी दहशतवादी संघटनेच्या यादीत कायम ठेवले आहे. त्या शिवाय पाकिस्तानातील लष्कर-ए-झांग्वीसह सात इतर संघटनांना देखील जागतिक दहशतवादी संघटनेच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तान सध्या एफएटीएफच्या ग्रे यादीत आहे. परंतु दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद थांबवण्यासह मनी लाँडरिंगवर २७ सूत्री कारवाई योजनेची अंमलबजावणी करणे पाकला बंधनकारक आहे. तसे न झाल्यास पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश होऊ शकतो. एफएडीएफच्या शेवटच्या बैठकीत पाकिस्तानने केवळ २१ मुद्यांवर काम केल्याचे स्पष्ट झाले होते.

ग्रे यादीत असल्याने मदत कठीण
पाकिस्तान ग्रे यादीतून बाहेर आले नाहीतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक व युरोपीय संघाची आर्थिक मदत मिळणेही कठीण होणार आहे.