आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया- यु‍क्रेन युध्‍द:पुतीन यांना झटका; बल्गेरियामध्ये युक्रेनच्या रणगाड्यांची दुरुस्ती

बल्गेरिया5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियाला युरोपमधून सातत्याने विरोध वाढू लागला आहे. रशियाचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या बल्गेरियाने रशियावर कडक निर्बंध लागू केल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर बल्गेरियाने युक्रेनचे रणगाडे, हेलिकॉप्टर यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

त्याचबरोबर युक्रेनच्या सैन्यालाही मदत केली जाईल, असे स्पष्ट केले.बल्गेरियाने रशियाच्या अनेक अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपामुळे देशातून हाकलून लावले आहे. रशियाचा हल्ला लक्षात घेऊन स्वीडनला मदत केली जाईल, असा प्रस्ताव ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मांडला आहे. स्वीडनला नाटोचे सदस्यत्व मिळावे असे ब्रिटनला वाटते. त्यासाठी पाठिंबा दिला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...