आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Boeing 777 Engine Fire In America ; Parts Were Started Burning In The Air, The Pilot Made A Safe Emergency Landing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठा अपघात टळला:हवेत असताना बोइंग 777 च्या इंजिनमध्ये लागली आग, वैमानिकाच्या सतर्कतेमुळे वाचले 241 जणांचे प्राण

डेनवर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रनवेवरुन उड्डाण घेताच लागली आग

अमेरिकेत रविवारी एक मोठा अपघात टळला आहे. हजारो फूट उंचीवर हवेत असताना अचानक बोइंग 777 चे इंजिन फेल झाले आणि काही क्षणातच इंजिनने आग पकडली. या कमर्शियल विमानात 231 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स होते. इंजिनला आग लागल्याची कळताच पायलटने तात्काळ विमानाचे लँडिंग केले आणि सर्वांचे प्राण वाचले.

रनवेवरुन उड्डाण घेताच लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइट डेनवरवरुन होनोलुलुकडे जात होती. डेनवर एअरपोर्टवरुन उड्डाण घेतल्यानंतर काही मिनीटातच विमानाच्या इंजिनमध्ये आग लागली. यावेळी, नॅशनल ट्रांसपोर्ट सेक्योरिटी बोर्ड (NTSB) ने घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे.

विमानातील प्रवाशाने जळत्या इंजिनचा व्हिडिओ घेतला

विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. यावेळी पाटलने सर्वांना हिम्मत दिली आणि शांत केले. यादरम्यान एका प्रवाशाने इंजिनचा व्हिडिओ बनवला.