आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंडे पॉझिटिव्ह:बोलिव्हिया : मोबाइल, इंटरनेटपासून दूर मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षकाची सायकलवरून घरपोच शाळा!

एक्विल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिण अमेरिकेतील देशात दुर्गम भागात लॉकडाऊनमध्येही अध्यापनाचा ध्यास
Advertisement
Advertisement

बोलिव्हियातील दुर्गम भागातील आेबडधोबड रस्त्यांवरून सध्या एक व्यक्ती सायकलच्या मागे फळा टांगून जाताना हमखास दिसून येतो. विल्फ्रेडो नेग्रेटे असे त्यांचे नाव. ते तांड्यावरील मुलांना शिकवण्यासाठी सायकलवरून अनेक किलोमीटरचा प्रवास करतात. वेळ पडल्यास अनेकदा पायी देखील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात.

दक्षिण अमेरिकेतील देश बोलिव्हियातही काेराेनामुळे मार्चपासून शाळांना टाळे आहेत. संकट लवकर संपेल असे दिसत नाही. त्यामुळे सरकारने मुलांना ऑनलाइन अभ्यास करण्याचा सल्ला दिला. शाळांना त्याची सुरुवातही केली. परंतु, नेग्रेटे यांच्या वर्गातील १९ पैकी १३ मुलांकडे मोबाइल व इंटरनेटची व्यवस्था नाही. त्यामुळे ते अभ्यास करू शकत नव्हते. नेग्रेटे यांना याबद्दलची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या सायकलला एक ट्रॉली जोडली. त्याला फळा लावला आणि मुलांना शिकवण्यासाठी निघाले. त्यांनी इतर शाळांतील मुलांनाही अभ्यासात मदत केली आहे. या कामासाठी नेग्रेटे यांना अतिरिक्त मानधन मिळत नाही. परंतु, नेग्रेटे कामावर समाधानी आहेत. ते म्हणाले, मुलांचे शिक्षण खंडित झाले नाही. त्यांचा अभ्यास हाेतोय हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. काही मुलांना मोबाइलची सुविधा उपलब्ध झाली तरी एक्विल व काही जवळच्या वस्त्यांमध्ये बँडविड्थ कमी आहे. त्यामुळे होमवर्क देखील डाऊनलोड करता येत नाही. त्यामुळे मी सायकलवरून शाळेलाच घरपोच नेले आहे. फावल्या वेळेतही नेग्रेटे घरी देखील शिकवतात. त्यांच्याकडे परिसरातील मुले मोठ्या संख्येने येतात. वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची आई आेवल्डिना पोर्फिडिआे म्हणाल्या, आम्ही मुलांच्या शिक्षणाबद्दल खूप चिंतीत होतो. परंतु, नेग्रेटे यांनी ही समस्या सोडवली. आेवल्डिना यांना शिक्षणासाठी अनेक किमीवरून दोन मुलांना घेऊन येथे यावे लागते.

स्वच्छता, प्रतिकारशक्तीचे शिक्षण
नेग्रेटे वर्गात एक टेबलही ठेवतात. त्यावर सॅनिटायझर, डिसइन्फेक्टेड असते. वर्गाच्या आधी विद्यार्थ्यांना ते वापरणे अनिवार्य आहे. त्याशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणता आहार घ्यावा याबद्दलही नेग्रेटे मुलांना मार्गदर्शन करतात.

Advertisement
0