आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलमध्ये नव्या राष्ट्राध्यक्षांना शपथ:नव्या राष्ट्राध्यक्षांना सत्ता न सोपवता बोल्सोनारा विदेशात

ब्राझीलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलमध्ये लुइज इनासियो लुला द सिल्व्हा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीसाठी ३ लाखांहून अधिक लोक जमा झाले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उजव्या विचारसरणीचे नेते जॅर बोल्सोनारो यांना हरवून त्यांनी पुनरागमन केले होते. असे असताना बोल्सोनारो यांनी अनेक दिवस पराभव मान्य केला नाही. त्यांचे समर्थकही लुलांना विरोध करत आहेत. यादरम्यान, बोल्सोनारो अमेरिकेला गेले आहेत. ते गेल्याने ब्राझीलची लोकशाही परंपराही खंडीत झाली आहे,ज्यात लुलांना राष्ट्रपतीपदाच्या शपथविधीत सत्तांतराचे प्रतीक औपचारिक रेबिन सोपवायची होती. ब्राझीलमधून जाताना बोल्सोनारो म्हणाले की, ते एक लढाई हरले असले तरी युद्ध हरले नाही. लवकरच परत येईन.

भारताचे विश्वासू साथीदार, नाते वृद्धिंगत होण्याची आशा भारताच्या परराष्ट्र धोरणात द.अमेरिकेतील देश ब्राझीलचे महत्त्व आहे. लुला भारताचे विश्वासार्ह साथीदार राहिले आहेत. २००४ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास लुला प्रमुख पाहुणे होते. २०१२ च्या अखेरीस त्यांना इंदिरा गांधी शांतात सन्मान दिला होता. ब्राझील भारतासोबत ब्रिक्स, इबसा, जी-२०चाही सदस्य आहे. गेल्या एका दशकात जगात बराच बदल झाला आहे. पीएम मोदींना जेव्हा ते भेटतील तेव्हा देशांतर्गत दहशतवाद प्रमुख मुद्दा राहील. भारत यात ब्राझीलला चांगला सल्ला देऊ शकतो.

3 आव्हाने : महागाई, वाढती उपासमार, अॅमेझॉन वनक्षेत्र वाचवणे 1 अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे पहिले आव्हान आहे. या वित्त वर्षात विकास दर २.९% राहण्याचा अंदाज आहे.पुढील वर्षी तो कमी राहण्याची शक्यता आहे.

2 अशात लोकसंख्या २०१९ च्या तुलनेत ६% वरून वाढून आता १६% झाली आहे. अशा स्थिती लोकांच्या उपजिविकेसाठी त्यांना पुरेसे अन्न मिळत नाही.

3 बोल्सोनारोंच्या टर्ममध्ये अॅमेझॉन वनक्षेत्राती वृक्षतोडीची गती ६०% वाढली आहे. लुला यांनी हे रोखण्यासाठी मरीना सिल्व्हांना मंत्री केले आहे.

बातम्या आणखी आहेत...