आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अराजकतेचा धोका:पराभवाच्या उंबरठ्यावर बोल्सोनारो; हिंसाचारासाठी चिथावणीचेही प्रयत्न

ब्राझील2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राझीलमध्ये रविवारी राष्ट्रपतिपदासाठी मतदान होणार आहे. २२ कोटी लोकसंख्येच्या ब्राझीलला छावणीचे रूप आले आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान हिंसाचार उसळण्याची शंका व्यक्त केली जाते. कट्टरवादी विद्यमान राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांचा पराभव निश्चित मानला जातो. शनिवारच्या अखेरच्या टप्प्यात बोल्सोनारो यांना ३९ टक्के, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी लुला डा सिल्वा यांना ५४ टक्के मत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. मतदानातील अंतर वाढू शकते. बोल्सोनारो यांनी समर्थकांना हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणी देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असलेले बोल्सोनारो पक्ष कार्यकर्त्यांना निवडणुकीतील पराभव मान्य केला जाऊ नये, असे आवाहन करत आहेत. मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर शस्त्रे आणण्यास मनाई असतानादेखील अनेक ठिकाणी बोल्सोनारो समर्थक उघडपणे शस्त्रास्त्र घेऊन मतदारांना धमक्या सुरु झाल्या.

बोल्सोनारोंचा ट्रम्प प्लॅन, पराभूत झाल्यास आरोप
बोल्सोनारो यांनी चार वर्षांच्या राष्ट्रपतिपदाच्या कार्यकाळात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अनुकरण केले. परंतु तेथे ट्रम्प यांनी निवडणुकीतील पराभवानंतर मतदानात घोटाळा झाल्याचा मुद्दा मांडला होता. बोल्सोनारो तोच मुद्दा निवडणुकीच्या आधीपासून मांडून कार्यकर्त्यांना भडकवू लागले आहेत. निवडणूक संचलन करणाऱ्या समितीमधील प्रमुख पदाधिकारी लुला यांचे समर्थक आहेत, असा आरोप आहे. लुला यांच्यासोबत संगनमत करून मतदान यंत्रात घोटाळा केला आहे. देशात १९९६ पासून ईव्हीएमने मतदान होत आहे. परंतु कधीही यंत्रावर संशय नव्हता.

बुलेटप्रूफ जॅॅकेट परिधान करून निवडणूक प्रचार
ब्राझीलमध्ये यंदाच्या निवडणुकीत द्वेष वाढल्याचे दिसून आले. त्यामुळेच बोल्सोनारो व लुला हे दोन्ही नेते बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून प्रचार करत होते. अलीकडे राष्ट्रपती बोल्सोनारोंच्या एका समर्थकाने लुला समर्थकाची सुरीने हत्या केली होती. बोल्सोनारो यांच्यावर गेल्या निवडणुकीत प्रचारादरम्यान हल्लाही झाला होता. ब्राझीलमध्ये गँगवॉरमुळे गुन्हेगारी दिसते. निवडणुकीच्या काळात मोठे राजकीय पक्ष हिंसाचार पसरवण्यासाठी गँगला भाड्याने घेतात. निवडणूक प्रचार काळात राजकीय हिंसाचाराच्या २५० हून जास्त घटना घडल्या. २ हजार लोकांना अटक झाली.

भ्रष्टाचाराचे उच्चाटन
वर्कर्स पार्टीचे लुला यांनी निवडणुकीत भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याची मोहीम सुरू केली. ते म्हणाले, बोल्सोनारोंच्या कार्यकाळात भ्रष्टाचार वाढला. लुलादेखील राष्ट्रपती होते. परंतु भ्रष्टाचारावरून त्यांना हे पद सोडावे लागले होते.

शस्त्र परवाना हवा
ब्राझीलमध्ये स्वसंरक्षणाच्या नावावर बंदूक परवाना देण्याचे बोल्सोनारो समर्थक आहेत. यातून ब्राझीलमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल असे त्यांना वाटते. सोबतच नागरिकांमध्ये सुरक्षेची भावनादेखील वाढेल.

बातम्या आणखी आहेत...