आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलमध्ये पुन्हा स्फोट:कारमध्ये ठेवण्यात आला होता बॉम्ब, स्फोटात 4 ठार; अनेक जखमी

काबूल17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. टोलो न्यूजनुसार, काबूलमधील बतखक स्क्वेअरमध्ये हा स्फोट झाला. येथे एका कारमध्ये स्फोटक ठेवण्यात आले होते, त्यामुळे हा स्फोट झाला.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. याआधी सोमवारी काबूलमध्ये सायकलमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्यात आला होता.

हजरत झकेरिया मशिदीत झाले आहेत स्फोट
25 मे रोजी, बाल्ख प्रांताच्या राजधानीत तीन स्फोट झाले, ज्यात नऊ लोक ठार आणि 15 जखमी झाले होते. त्याच दिवशी काबूल शहरातील शरीफ हजरत झकेरिया मशिदीत झालेल्या स्फोटात सुमारे दोन उपासकांना आपला जीव गमवावा लागला होता. याआधीही हजरत झकेरिया मशिदीत स्फोट झाला होता, ज्यात ३० जणांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...