आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Bomb Blasts Also Destroy 53 UNESCO Sites, Ukraine's Efforts To Preserve Heritage, Preserve Cultural Identity| Marathi News

युक्रेन:बॉम्बस्फोटांनी 53 युनेस्को स्थळेही उद्ध्वस्त, वारसा जतन करण्याचा युक्रेनचा प्रयत्न, सांस्कृतिक ओळख वाचवणे जिकिरीचे

कीव्ह4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये आतापर्यंत ५३ युनेस्को स्थळे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र, युक्रेनचे लोक रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या सैन्याकडून झालेल्या हल्ल्यांत नष्ट झालेली सांस्कृतिक ओळख वाचवत आहेत. बॉम्बस्फोटांची पर्वा न करता लोक प्राचीन मूर्ती आणि इतर वारसा स्थळे वाचवण्यासाठी वाळूच्या गोण्या आणत आहेत. राजधानी कीव्हमधील सेंट अँडूज यांचे चित्र वाळूच्या गोण्यांची झाकले आहे. स्वयंसेवक दिवस-रात्र कष्ट घेत आहेत. कीव्हमध्येच प्रिन्सेस ओल्गा आणि युक्रेनचे राष्ट्रनायक सिरील यांची भव्य प्रतिमाही वाळूच्या गोण्यांद्वारे सुरक्षित ठेवली आहे.

बातम्या आणखी आहेत...