आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अमेरिका:बॉम्बार्डियरचे नवे जेट, दिल्ली ते सिडनीपर्यंत विनाथांबा उडू शकते

कन्सास (अमेरिका)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस जेट निर्माण करणारी आघाडीची कंपनी बॉम्बार्डियरने नवे बिझनेस जेट तयार केले आहे. ग्लोबल ५५०० नावाचे हे विमान एका उड्डाणात ५,९०० नॉटिकल मैल (१०९२६.८ किमी) अंतर कापू शकते. हे याचे स्पर्धक विमान ७०० नॉटिकल मैल (१२९६.४ किमी) अधिक आहे. म्हणजे, या विमानाच्या उड्डाणात थेट दिल्लीहून सिडनीपर्यंत पोहोचता येऊ शकते. दिल्लीहून सिडनीतील हवाई अंतर १०,४२६ किमी आहे. या विमानाचे केबिन आपल्या श्रेणीतील सर्वात मोठे आहे. याचे केबिन ७.११ फूट रुंद, ६.२ फूट उंच आणि ५०.९ फूट लांब आहे. या विमानात एका वेळी १६ लोक प्रवास करू शकतात.