आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत पुस्तकासारखे ग्रंथालय:11 लाख पुस्तकांचा संग्रह, मध्यपूर्व आशियातील सर्वात मोठे राशिद ग्रंथालय सामान्यांसाठी खुले

दुबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यपूर्व आशियातील सर्वात मोठे राशिद ग्रंथालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. पुस्तकाच्या प्रतिकृतीच्या रूपात लायब्ररीचे बांधकाम केलेले आहे. या ग्रंथालयात ११ लाख पुस्तके आहेत. सोबतच ६० लाख निबंध, ७३ हजार म्युझिक नोट्स, ७५ हजार व्हिडिओ, ५ हजार पांडुलिपीचे दस्तऐवज, वृत्तपत्राच्या ३५ हजार प्रतीही संग्रहित ठेवण्यात आल्या आहेत. सोबतच ३२५ वर्षे जुनी अनेक पुस्तकेही येथे वाचायला मिळतात.

ग्रंथालयात डिजिटल बुक्सचाही संग्रह आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचाही यात वापर करण्यात आला आहे. रोबोटिक गाइडच्या मदतीने लोक आपल्या पसंतीचे पुस्तक निवडू शकतात. एआय कियोस्कही लावण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बुकशेल्फला स्वयंचलित स्वरूपात तयार केले आहे. त्यामुळे वाचक फरताळाच्या सर्वात वरील भागात असलेल्या सहजपणे पुस्तकाला खाली आणू शकतात.

  • 2100 कोटी रुपये खर्चून राशिद लायब्ररीची उभारणी करण्यात आली आहे.
  • 54 हजार चौरस फूट क्षेत्रफळ. सात मजली इमारत. पहिल्या मजल्यावर बालसाहित्य आहे.
बातम्या आणखी आहेत...