आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Borders Remained Closed Due To Corona, Yet 30 Lakh People Became Homeless, One Crore People Without Country; News And Live Updates

आज जागतिक शरणार्थी दिवस:जगातील प्रत्येक 96 वा माणूस बेघर, 1 कोटी लोकांचा कोणताही देश नाही; कोरोना काळात सीमा बंद झाल्याने 30 लाख लोक झाले निर्वासित

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 42 लाख लोक शोधत आहे दुसर्‍या देशात आश्रय

जगात गेल्या काही दिवसांपासून निर्वासित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगातील प्रत्येक 96 वा माणूस बेघर आहे. कारण अनेक देशात युद्धजन्य परिस्थिती, दडपशाही आणि कमी होणाऱ्या संसाधनामुळे निर्वासितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. सीरियामध्ये 1.1 कोटी लोक बेघर असून हे लोकसंख्येच्या 45 टक्के आहे. तर दुसरीकडे जगातील 1 कोटी लोकांचा कोणताचा देश नसल्याचे समोर येत आहे. हा मानवी समुहाकरिता अवघड बनत चाललेला प्रश्न आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्वासित एजन्सीचे आयुक्त फिलिप्पो ग्रान्डी यांच्या म्हणण्यानुसार, जगात कोरोना महामारीच्या कडक लॉकडाऊन दरम्यानही 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 30 लाख लोक विस्थापित झाले. आज 20 जून जागतिक शरणार्थी दिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया बेघर लोकांचे हाल...

2019 पर्यंत तेथे 7.9 कोटी विस्थापित होते, 2020 मध्ये ते 4 टक्क्यांनी वाढून 8.24 कोटींवर गेले

  • जगातील बेघर लोकांची संख्या - 8.24 कोटी
  • अंतर्गत विस्थापित लोक - 4.57 कोटी
  • शरणार्थी लोक - 2.64 कोटी

42 लाख लोक शोधत आहे दुसर्‍या देशात आश्रय
सीरिया: ईशान्येकडील अनेक कुर्दांचे 1962 मध्ये नागरिकत्व काढून घेण्यात आले. सीरियामध्ये यापूर्वी अंदाजे 3 लाख राज्यविहीन कुर्द होते. या देशात 1:1 कोटी लोक विस्थापित झाले असून 67 लाख लोकांनी दुसर्‍या देशात आश्रय घेतला आहे.

अफगाण निर्वासित : जगात तिसर्‍या क्रमांकावर अफगाण निर्वासित आहे. अमे‍रिकेने 2001 मध्ये केलेल्या आंतरिक युद्धावरुन हे बेघर झाले होते.

रोहिंग्या...जगातील सर्वात मोठे निर्वासित संकट

हे रोहिंग्या बांगलादेशातील चटगाव आण‍ि म्यानमार राखिन भागात राहत होते. 2014 च्या जनगणनेत दहा लाख रोहिंग्या बाहेर झाले होते. त्यानंतर 2017 मध्ये तेथे झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना पलायन करावे लागले.

भारतात 40 हजार रोहिंग्या
केंद्र सरकारने 2017 मध्ये भारतात 14 हजार रोहिंग्या राहत असल्याचे संसदेत सांगितले होते. परंतु, भारतात अंदाजे 40 हजार रोहिंग्या राहत असून निर्वासितांची संख्या 2 लाखांवर आहे.

बांग्लादेशात 7 लाख निर्वासित
2017 मध्ये बांग्लादेशमधील कॉक्स बाजारात 7 लाखांवर रोहिंग्या आले होते. 15 वर्षांपूर्वी समुद्रात उदयास आलेल्या 40 चौरस किलोमीटरच्या भासन चार बेटावर एक लाख निर्वासितांना स्थायिक करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...