आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Boris Johnson Married His 23 year old Girlfriend Carrie Symonds; The Ceremony Took Place In The Cathedral Church

ब्रिटिश पंतप्रधानांचे सीक्रेट वेडिंग:​​​​​​​बोरिस जॉन्सन यांनी 23 वर्षाने लहान असलेल्या कॅरी सायमंड्सशी केले लग्न; कॅथेड्रल चर्चमध्ये झाला समारंभ

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान झाल्यापासून ते एकत्र राहत होते

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शनिवारी आपल्यापेक्षा 23 वर्षे लहान असलेल्या गर्लफ्रेंड कॅरी सायमंडशी एका सीक्रेट समारंभात लग्न केले. ब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्यानुसार, हे लग्न समारंभ वेस्टमिन्स्टर कॅथेड्रल चर्चमध्ये झाले.पण, पंतप्रधान जॉन्सन यांच्या डाऊनिंग स्ट्रीट कार्यालयाच्या प्रवक्त्याने या अहवालांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

ब्रिटीश वृत्तपत्र 'द सन' आणि 'मेल ऑन संडे' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या लग्नातील सर्व पाहुण्यांना शेवटच्या क्षणी आमंत्रित केले गेले असल्याचे म्हटले आहे. कारण या लग्न समारंभाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील देण्यात आली नव्हती. ब्रिटनमध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केवळ 30 लोकांनाच लग्नात उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

पंतप्रधान झाल्यापासून ते एकत्र राहत होते

  • बोरिस जॉन्सन यांनी 2019 मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तेंव्हापासून ते आपल्यापेक्षा 23 वर्षे लहान असलेल्या गर्लफ्रेंड कॅरी सायमंडसोबत डाऊनिंग स्ट्रीटमध्ये राहत होते. त्यांनी गेल्या वर्षीच कॅरी आणि आपल्या संबंधांची घोषणा केली होती. तसेच 2020 मध्ये जन्मलेल्या आपल्या मुलाचे नावदेखील सांगितले होते.
  • जॉन्सन आणि कॅरी यांनी आपल्या मुलाचे नाव विलफ्रेट लॉरी निकोलस जॉनसन ठेवले होते. लग्नाची आमंत्रणे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना जुलै 2020 मध्ये पाठविण्यात आली असल्याचे महिनाभरापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.

बोरिस यांचा दोनदा घटस्फोट

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे खाजगी जीवन नेहमीच खूप क्लिष्ट राहिले असून त्यांचा आतापर्यंत दोनदा घटस्फोट झाला आहे. त्यांचे पहिले लग्न 1987 मध्ये अ‍ॅलेग्रा मस्टिन-ओवेन बरोबर झाले होते. पण दोघेही 1990 मध्ये वेगळे झाले. त्यानंतर त्याचे दुसरे लग्न बालपणीची मैत्रीण आणि वकील मरीना व्हीलरशी लग्न झाले होते. त्या दोघांनाही चार मुले आहेत. परंतु, ते सुद्धा सप्टेंबर 2018 मध्ये दोघे वेगळे झाले.

दुसरी पत्नी मेरीना व्हीलर आणि बोरिस जॉनसन सप्टेंबर 2018 मध्ये विभक्त झाले.
दुसरी पत्नी मेरीना व्हीलर आणि बोरिस जॉनसन सप्टेंबर 2018 मध्ये विभक्त झाले.
बातम्या आणखी आहेत...