आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन लॉकडाऊन पार्टी:पीएमवर राजीनाम्यासाठी दबाव; ऋषी पहिली पसंती!, जॉन्सन यांची लोकप्रियता 36 टक्क्यांवर

लंडन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाच्या लाॅकडाऊन काळात मद्यधुंद पार्टीनंतर संसदेतील माफीनाम्यानंतरही पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला आहे. त्यातच भारतवंशीय अर्थमंत्री ऋषी सुनाक यांच्या लाेकप्रियतेत वाढ हाेत चालली आहे. त्यांच्याच पक्षातील ४६ टक्के लाेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. जाॅन्सन यांच्यापेक्षा सुनाक चांगले पंतप्रधान हाेऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. युगाॅव पाेलच्या निष्कर्षातून हा दावा करण्यात आला आहे. सुनाक पंतप्रधान झाल्यास २०२४ मध्ये हाेणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत काॅन्झर्व्हेटिव्ह पार्टीला चांगला काैल मिळू शकेल, असा अंदाज आहे. राजीनाम्यासाठी दबाव असतानाच काॅन्झर्व्हेटिव्हच्या प्रत्येकी १० पैकी ६ मतदारांनी जाॅन्सन यांची कार्यपद्धती चांगली नसल्याचे मत व्यक्त केले आहे. पाहणीतील एक तृतीयांश लाेकांनी जाॅन्सन यांनी पद साेडावे असा सल्ला दिला. जुलै २०२० नंतर जाॅन्सन यांच्या लाेकप्रियतेत माेठी घसरण मानली जाते.

लेबर पार्टीची आघाडी
यूगॉव पोलनुसार गुरूवारी जाहीर निकालात ब्रिटनमध्ये विरोधी पक्ष लेबर पार्टीला कॉन्झर्व्हेटिव्हच्या तुलनेत १० टक्के आघाडी मिळाली आहे. लेबर पार्टीला ३८ टक्के समर्थन मिळाले आहे. लेबर पार्टीला २०१३ नंतर सर्वाधिक पाठिंबा मिळाला आहे. सत्ताधारी पक्षासाठी हा धक्का आहे.

दावेदारांत प्रीती पटेलही
ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेलही पंतप्रधानपदाच्या दावेदार मानल्या जातात. पटेल यांचा स्थलांतरितांना आश्रय देण्यास विराेध राहिला आहे. त्यांची दावेदारी देखील चर्चेत आहे.

ब्रेक्झिट समर्थक : ऋषी सुनाकचे आई-वडील पंजाबी वंशाचे आहेत. ते पूर्व आफ्रिकेतून १९६० च्या दशकात इंग्लंडमध्ये आले. पूर्वाश्रमीचे बँकर. २०१५ मध्ये निवडणूक जिंकले. थेरेसा सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्री राहिलेले सुनाक ब्रेक्झिट समर्थक आहेत.

सुनाक यांच्या दावेदारीची ४ कारणे
1. काेराेनाकाळात देशाला आर्थिक मंदीतून यशस्वीपणे बाहेर काढले. सर्व वर्गात समाधान.
2. २०२० मध्ये हाॅटेल उद्याेगासाठी ‘ईट आऊट टू हेल्प आऊट’ याेजनेद्वारे १५ हजार काेटींची मदत.
3. कर्मचारी, स्वयंराेजगार क्षेत्रातील लाेकांसाठी आॅगस्ट २०२१ मध्ये दाेन लाखांची मदत.
4. ब्रिटनमध्ये काेराेनाच्या नव्या लाटेत संपूर्ण पर्यटन क्षेत्रासाठी १० हजार काेटींचे पॅकेज.

बातम्या आणखी आहेत...