आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान पाकिस्तानने नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी दिली पाहिजे, असे आवाहन केले आहे. सरकारचे समर्थन असलेला छळ संपला पाहिजे याबद्दल ब्रिटनचे सरकार काही भूमिका मांडेल का, असा प्रश्न ब्रिटनचे खासदार इम्रान अहमद खान यांनी विचारला हाेता. त्याला जाॅन्सन यांनी हे उत्तर दिले.
जाॅन्सन म्हणाले, माझ्या सन्माननीय मित्रांशी मी सहमत आहे. याच कारणामुळे दक्षिण आशियाच्या मंत्र्याने अलीकडेच पाकिस्तानच्या मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चेदरम्यान हा मुद्दा मांडला हाेता. पाकिस्तानने आपल्या नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी दिली पाहिजे, असा आमचा त्यांना आग्रह आहे. तत्पूर्वी ब्रिटनच्या संसदेत इम्रान अहमद खान यांनी पाकिस्तानातील पेशावरमध्ये रविवारी झालेल्या हत्येचा उल्लेख केला हाेता. या घटनेत ८२ वर्षीय महबूब अहमद खान यांची अमानुषपणे गाेळी मारून हत्या झाली. अलीकडे पेशावरमध्ये मारण्यात आलेले ते चाैथे अहमदी हाेते. जाॅन्सन यांचे सरकार पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर हाेणारा अन्याय व छळाचा मुद्दा चव्हाट्यावर आणेल का, असा प्रश्न अहमद खान यांनी विचारला हाेता. देशात सातत्याने हिंसाचार होत असला तरी पाकिस्तानातील कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे कारवाई करताना दिसून येत नाही.
कळसूत्री बाहुल्यांच्या सरकारला सत्तेवरून खेचा : बिलावल
गिलगिट । गिलगिट-बाल्टिस्तानच्या निवडणूक प्रचार माेहिमेत पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांनी कळसूत्री बाहुल्यांच्या सरकारला सत्तेवरून खेचण्याचे आवाहन केले. त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हल्लाबाेल केला. इम्रान यांच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. पुन्हा इम्रान सत्तेवर आल्यास ते सगळ्या कंपन्यांना विकून टाकतील. त्याचबराेबर राेजगारही गमवावा लागेल, असा आराेप बिलावल यांनी केला. गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभा निवडणुकीसाठी १५ नाेव्हेंबरला मतदान हाेणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.