आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमध्ये काेराेनाची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरली आहे. डेल्टा व्हेरिएंट हे त्याचे कारण मानले जाते. त्यावरून पंतप्रधान कार्यालयाने लसीकरणासंबंधी संयुक्त समितीकडे एक सल्ला मागितला आहे. दाेन डाेसमधील अंतर कमी करण्याची जाॅन्सन यांची इच्छा आहे. त्यात दाेन डाेसमधील अंतर आठएेवजी चार आठवडे करता येऊ शकेल का? असा प्रश्न त्यात जाॅन्सन यांनी विचारला आहे. ‘संडे टाइम्स’ने ही माहिती दिली. ब्रिटनची एकूण लाेकसंख्या ६.८२ काेटी आहे. त्यापैकी ६८.५ टक्के लाेकांना पहिला डाेस व ५१.७ टक्के लाेकांना दाेन डाेस दिला आहे. गेल्या २४ तासांत ३२.३६७ नवे रुग्ण आढळून आले आणि ३४ लाेकांचा मृत्यू झाला. ब्रिटनमध्ये पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन १९ जुलैपासून अनलाॅक करू इच्छितात. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे तज्ञ याद्वारे दबाव देण्याचा प्रयत्न करत आहेत.
परदेशी प्रवासावर निर्बंधात सवलत देण्याचा दबाव, सरकारसमोर अडचणी
ब्रिटनमध्ये सरकारचे मंत्रीही देशांतर्गत व परदेशी प्रवासावर निर्बंधात सवलत देण्याची मागणी करत आहेत. काही मंत्री त्याच्या विराेधात आहे. वाहतूक मंत्री ग्रँट शॅप्स यांच्या म्हणण्यानुसार १९ जुलैनंतर दाेन डाेस घेतलेल्यांना परदेशातून आल्यावर क्वॉरंटाइन केले जाणार नाही. परंतु ग्रीन ट्रॅव्हल यादीत समाविष्ट असलेल्या देशांतून आलेल्यांनाच ही सवलत मिळेल. अकॅडमी आॅफ राॅयल मेडिकल काॅलेजेसचे प्राेफेसर हेलेन स्टाॅक्स-लॅम्पार्ड म्हणाले, १९ जुलै राेजी सर्व निर्बंध हटवण्याबाबत गंभीर रूपाने चिंतित आहे. अनलाॅकनंतर जीवन सामान्य हाेईल, असे लाेकांना वाटते. परंतु ही गाेष्ट धाेकादायक ठरू शकते.
आराेग्यमंत्र्यांचा इशारा- ५३ लाख लाेक रुग्णालयात प्रतीक्षेत
ब्रिटनचे आराेग्यमंत्री साजिद जाविद अनलाॅकच्या आधीपासून निर्माण झालेल्या परिस्थितीवर चिंतित आहेत. सध्या देशातील रुग्णालयांत ५३ लाख रुग्ण प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ्यापर्यंत ही संख्या दुप्पट हाेऊ शकते. एखाद्या आजाराने पीडित असलेल्यांचीही माेठी संख्या आहे. परंतु काेराेना महामारीमुळे उपचारासाठी रुग्णालयात जाताना दिसत नाहीत. देशात बहुतांश ठिकाणी नवे रुग्ण आढळून येत आहेत. नव्या रुग्णांचे प्रमाण गेल्या पूर्वी इतकेच झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.