आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Born In Four And A Half Months, Richard Has Finally Won The Battle Of Life, Celebrating His Baby's First Birthday At Home!; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:साडेचार महिन्यांत जन्मलेल्या रिचर्डने अखेर जीवनाची लढाई जिंकली, बाळाचा पहिला वाढदिवस घरी धडाक्यात साजरा!

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रसूतीच्या 131 दिवस आधी जन्मलेल्या बाळाचे वजन होते 338 ग्रॅम

एक प्रसूतीच्या १३१ दिवस अाधी जन्मलेले एक बाळ. तेव्हा वजन ३३८ ग्रॅम हाेते. जगभरात जन्मलेल्या प्रसूतीपूर्व काेणत्याही बाळापेक्षा त्याचे वजन कमी हाेते. म्हणूनच त्याची जगण्याची आशा कमी हाेती. परंतु जीवनातील सर्व अडथळे व लाेकांच्या शंका दूर करून या निष्पाप बाळाने जीवनयुद्ध जिंकले आहे. आता हे बाळ एक वर्षाचे झाले आहे. त्याने शनिवारी आपला पहिला जन्मदिन देखील साजरा केला. अमेरिकेत जन्मलेल्या या बाळाचे नाव रिचर्ड स्काॅट विल्यम हचिंसन आहे. २७० दिवसांच्या एेवजी (नऊ महिने) केवळ १३९ दिवसांत जन्माला आलेले रिचर्ड हे जगातील पहिलेच बाळ ठरले आहे. त्यामुळेच रिचर्डचे नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये नाेंदवण्यात आले.

रिचर्डचे आई-वडील म्हणाले, बाळाने सर्व शारीरिक मर्यादा आेलांडल्या आहेत. ताे इतर मुलांप्रमाणेच सामान्य व निराेगी आहे. रिचर्डच्या जीवनाच्या काही आठवडे आधीचा काळ खूप कठीण हाेता. परंतु ताे सर्व अडथळे आेलांडेल, याचा विश्वास वाटत हाेता. त्याचे प्राण वाचतील, असे वाटायचे. आई बेथ म्हणाल्या, काेराेनाच्या काळात ताे आम्हा सर्वांवर विश्वास ठेवू लागला. रुग्णालयात सहा महिने राहिल्यानंतर रिचर्डला पहिल्यांदा २० डिसेंबर २०२० राेजी घरी आणण्यात आले. त्या दिवशी घरातील पाळण्यात रिचर्डला पाहून डाेळे पाणावले हाेते.

मुलाने जागतिक विक्रम नोंदवला
रिचर्डचे आई -वडील म्हणाले, रिचर्डने जागतिक विक्रम नाेंदवल्याचेे आम्हाला आश्चर्य वाटते व आनंदही हाेताे. रिचर्ड जगभरात चर्चेत आहे. त्यामुळे प्रसूतीपूर्व मुलांना यापुढे मदत मिळू शकेल. रिचर्डचे शरीर खूप लहान हाेते. त्याचे आई-वडील त्याला तळहातावर धरू शकत हाेते.

बातम्या आणखी आहेत...