आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैथी लाट उंबरठ्यावर:इस्रायलच्या 60 टक्के लाेकांना दाेन्ही डाेस, पण रुग्ण वाढल्याने लाॅकडाऊनचा विचार

जेरुसलेम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदर्श ठरलेल्या इस्रायलमध्ये नवे रुग्ण वाढले

काेराेना महामारीचे उच्चाटन करण्यासाठी ९० लाख लाेकसंख्येच्या इस्रायलने जगासमाेर एक आदर्श निर्माण केला. इस्रायलमध्ये ६० टक्के लाेकसंख्येला दाेन डाेस देण्यात आले आहेत. त्याचबराेबर बारा वर्षांवरील मुलांनादेखील डाेस देण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर कमकुवत इम्युनिटी असलेल्या लाेकांना बूस्टर डाेस देण्यासही सुरुवात झाली आहे. परंतु आता इस्रायलमध्ये चाैथी लाट उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. इस्रायलमध्ये काेराेनाच्या नव्या रुग्णांची आकडेवारी ८ हजारांवर गेली आहे. मंगळवारी ८ हजार १२ रुग्ण आढळून आले हाेते. बुधवारी ७ हजार ४३ नवे रुग्ण आढळले हाेते. आता सरकार पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी लाॅकडाऊनवर विचार करत आहे. इस्रायलमध्ये सरकारच्या काेविड रिस्पाॅन्स पॅनलचे प्राेफेसर रॅन बेलिसर म्हणाले, डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात काेराेनाचे रुग्ण वाढले आहेत. देशात रुग्ण का वाढत आहेत याचे विश्लेषण केले जात आहे.

शेकडाे शाळा पुन्हा बंद, गर्दीवर निर्बंध
काेराेनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे मेमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. मुलेही शाळेत जात हाेती. परंतु त्यानंतर इस्रायलमध्ये काेराेनाचे रुग्ण वाढू लागले. रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन शेकडाे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. लाेकांना मास्क घालणे पूर्वीपासून अनिवार्य करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...