आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Boycott France : An Economic Blow To Both If Islamic Countries Boycott France; France Is The Seventh Largest Exporter And The 10th Largest Importer Of Imports

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फ्रान्सचा बहिष्कार:इस्लामिक देशांनी फ्रान्सवर बहिष्कार टाकल्यास दोघांनाही आर्थिक फटका; जास्त विरोध करणाऱ्या तुर्कीसाठी फ्रान्स निर्यातीत सातवा, तर आयातीत 10 वा मोठा भागीदार

पॅरिसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार; पाक, बांगलादेश, तुर्की, इराण, कुवेतसह अनेक देशांत निदर्शने
  • पाकच्या जीडीपीहून आयफेल टाॅवरची किंमत दुप्पट

बुरख्यावर बंदी, धार्मिक स्थळांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आधीच फ्रान्स आणि इस्लामिक देशांत तणाव आहे. त्यातच इस्लामिक कट्टरवाद्यांनी शिक्षकासह चार जणांच्या केलेल्या हत्येमुळे या वेळी प्रकरण गंभीर बनले आहे. अनेक इस्लामिक देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे जाहीर केले आहे. तुर्की, पाकिस्तान, बांगलादेश,कतार, इराण हे देश त्यात आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे फ्रान्सचा या देशांबराेबर वार्षिक १० हजार काेटी डाॅलर अर्थात सुमारे साडेसात लाख काेटी रुपयांचा व्यापारसंबंध आहे. सर्व इस्लामिक देशांनी फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार घातल्यास या देशाला माेठा धक्का बसू शकताे. परंतु त्याचे परिणाम दाेन्ही पक्षांवर पडलेले दिसू शकतात. कारण त्यात फ्रान्स ५५ टक्के भाग आयात देखील करताे.

पाकच्या जीडीपीहून दुप्पट किंमत तर आयफेल टाॅवरची

फ्रान्सच्या विराेधात तुर्कीनंतर पाकिस्तान सर्वात जास्त संताप दाखवू लागला आहे. परंतु त्याचा फ्रान्सवर काहीही परिणाम हाेणार नाही. ट्रेडिंग इकाॅनाॅमिकनुसार २०२० मध्ये पाकिस्तानचा जीडीपी २७ हजार काेटी डाॅलर राहण्याचा अंदाज आहे. पॅरिसमधील आयफेल टाॅवरची किंमत सुमारे ५८ हजार काेटी डाॅलर आहे. म्हणजेच पाकिस्तानच्या जीडीपीहून दुप्पट. त्याशिवाय आयफेल टाॅवरला पाहण्यासाठी दरराेज सुमारे १० लाख लाेक भेट देतात. फ्रान्सच्या व्यापारसंबंधात पाकिस्तान आघाडीच्या २० देशांतही नाही.