आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेन इंटरफेस तंत्रज्ञान:माणसाला 2022 पासून ब्रेन चिपलावू; माकडावर प्रयोग : मस्क

न्यूयाॅर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रेन इंटरफेस तंत्रज्ञान कंपनी न्यूरालिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क म्हणाले, आमच्या कंपनीने २०२२ पासून आपल्या ब्रेन चिपच्या मानवी प्रयाेगाला सुरुवात केली आहे. वाॅलस्ट्रीट जर्नलच्या वतीने आयाेजित काैन्सिल समिटमध्ये ते बाेलत हाेते. तेव्हा त्यांनी नव्या प्रयाेगाची माहिती दिली. बंदरांवरील चिपचा प्रयाेग यशस्वी ठरला आहे. हीच सुरक्षित पद्धती असू शकेल.

आता मानवावर यशस्वी प्रयाेग करण्यासाठी परवानगी मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. परवानगी मिळताच सर्वात आधी टेट्राप्लाजिक, क्वाड्रिप्लेजिक्ससारख्या मेरुरज्जेची समस्या असलेल्या लाेकांना सर्वात आधी लाभ मिळू शकेल. त्यातही गंभीर दुखापत असलेल्यांना आधी चिप मिळेल. न्यूरालिंकने न्यूरल इम्प्लांटला विकसित केले आहे. त्यासाठी बाहेरील हार्डवेअरची गरज भासत नाही. मेंदूच्या कार्यावर आधारित वायरलेस कार्यप्रणाली विकसित करण्यात आली आहे. दिव्यांग असलेल्यांना जास्त शक्तिशाली करण्याची आपल्याकडे या माध्यमातून संधी आहे. चालू न शकणाऱ्या, हाताने काम करू शकत नसलेल्या लाेकांना चिपच्या माध्यमातून शक्ती दिली जाऊ शकते. ९ एप्रिल २०२१ रोजी न्यूरालिंकने आपली चिप माकडात बसवली हाेती. त्याचा वापर करून माकड विविध प्रकारचे खेळ खेळू शकला. विविध खेळ खेळताना माकडाला न्यूराॅन्स फायरिंगबद्दल संकेत पाेहाेचवले. यातून माकड चाल कशी करायची ही गाेष्ट शिकले.

बातम्या आणखी आहेत...