आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्याची काळजी:संभ्रमामुळे मेंदू सक्षमतेने काम करत नाही, ध्यानातून 30 दिवसांत सुधारणा

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धावपळीच्या जीवनात आपल्या आराेग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. त्यातही मेंदूची. मेंदूला तल्लख आणि निराेगी ठेवण्यासाठी त्याला संभ्रमाच्या स्थितीत राहू देऊ नका. परिस्थितीबाबत तत्काळ निर्णय घ्या. अमेरिकेतील कॅनसस सिटी मिसाेरीच्या २६ वर्षीय काेडी इसाबेल यांचा न्यूराॅलाॅजी टिप्सचा व्हिडिआे त्यांनी १ लाख २२ हजारपेक्षा जास्त फाॅलाेअर्ससाठी पाेस्ट केला हाेता. परंतु हा व्हिडिआे आतापर्यंत १३ लाखांहून जास्त वेळा पाहण्यात आला आहे. न्यूराेसायंटिस्ट म्हणून त्यांनी परिस्थितीकडे कानाडाेळा करू नये, उलट त्याला प्राधान्य द्यावे, असा सल्ला दिला आहे. त्यासाठी त्यांनी दरराेज १० मिनिटांचे ध्यान अनिवार्य करण्याचा सल्ला दिला. दरराेज सक्रिय राहावे. ३० दिवसांत फरक दिसू लागेल.

मेंदूला निराेगी ठेवण्यासाठी निर्णयात विलंब नकाे न्यूराेसायंटिस्ट काेडी आपल्या व्हिडिआेत म्हणाल्या, मेंदूला निराेगी ठेवण्यासाठी निर्णय प्रक्रियेत विलंब करू नका. तुम्ही याेग्य वेळी निर्णय घेतल्यास तुमची एकाग्रता कायम राहू शकते. मेंदूची कार्यप्रणाली चांगली राहते. यातून तणाव कमी हाेताे. घबराटदेखील हाेत नाही.

बातम्या आणखी आहेत...